पालिकेने हटवले अतिक्रमण

पेटीत शाळेजवळील बाजार उठवला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे
– एकीकडे शहराने विकासाची कात टाकलेली असताना पालिका प्रशासनाच्या चुकिच्या धोरण नियोजनामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. कोरोना काळात भाजीबाजारसाठी तात्पुरती दिलेली जागा परमनंट केल्याने वाहतूकीचा प्रश्‍नांसह इतर अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. परंतु पालिकेला उत्पन्न मिळत असल्याने सोईस्करपणे या प्रश्‍नाकडे कानाडोळा केला जात होता. परंतु दोन दिवसांपूर्वी याच अतिक्रमणधारकांनी किरकोळ कारणावरून थेट घातक हत्याराने हल्ले करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणल्याने खडबडून जागे झालेल्या संगमनेर नगर पालिकेने शहरात अचानक अतिक्रमण हटाव मोहीम राबवत शहरातील अनेक ठिकाणावरील अतिक्रमण हटवले. यात नवीन अकोले रोडवरील पेटिट विद्यालयाजवळील भाजीबाजार हटवून हा वर्दळीचा रस्ता मोकळा केला.


शहरातल्या अकोले रस्त्यावरील पेटिट बी.एड. कॉलेजसमोर करोना काळात एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणारा बाजार त्यानंतरही कायमस्वरूपी राहिल्याने अपघाताचे व वादाचे मोठे केंद्र बनले होते. बाजार तिथून हटवण्याऐवजी पालिकेने तेथेच अशास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसविल्याने दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. मूळ प्रश्‍न असलेला हा बाजार तिथून हलवावा अशी मागणी या परिसरातील नागरिक व प्रवास्यांकडून केली जात होती.
कोरोना काळापासून नेहरू चौकातला भाजी बाजार शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भरवला जाऊ लागला. शहरातील सर्वांत वर्दळीच्या असलेल्या अकोले रस्त्यावरील बीएड कॉलेज परिसरात भाजी बाजार भरवण्यासाठीची आवश्यक जागा उपलब्ध नसताना रस्त्याच्या एका बाजूला गटार झाकून टाकण्यासाठी पालिकेने त्यावर ढापे टाकून पेव्हिंग ब्लॉक बसविले. आणि या फुटपाथचा वापर भाजीविक्रेत्यांसाठी होऊ लागला. हे इथपर्यंतच थांबले नाही तर या फुटपाथच्या पुढे दुकाने आणि त्याच्यापुढे खरेदीदाराच्या गाड्या त्यामुळे रस्ता अधिकच अरुंद बनला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने लागल्याने रस्ता अरुंद बनून अपघात आणि वादावादी वाढून नवे प्रश्‍न निर्माण झाले. मात्र दोन दिवसांपूर्वीच्या घटनेने सावध झालेल्या प्रशासनाने जोर्वे नाका येथील अतिक्रमणाबरोबरच शहरातील अनेक अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. या कारवाईचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आह

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख