दुष्काळी भागाला सुजलाम्सुफलाम् करणारे निळवंडे धरण

जिल्ह्यातील 66 हजार 266 हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी


युवावार्ता – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 मे 2023 रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी पार पडली. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकर्‍यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख…
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 68878 हेक्टर (1 लाख 70 हजार 200 एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील 2612 हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील 66266 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.


अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. निळवंडे धरणांचा पाणीसाठा 236 दक्षलक्ष घनमीटर, 8.32 टीएमसी ऐवढा आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 221.50 दक्षलक्ष घनमीटर ऐवढा आहे. धरणाची लांबी 533 मीटर आहे. सांडव्याची लांबी 72 मीटर आहे. 5 सांडव्याद्वारे 3700 क्यूमेक (घनमीटर प्रतिसेंकद) पाण्याचा विसर्ग होणार आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल 2023 अखेर 2351 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. 14 जूलै 1970 रोजी प्रकल्पास 8 कोटी रूपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 25 मार्च 1977 रोजी 16 कोटी रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर 22 जून 1993 रोजी 234 कोटी रूपयांची दुसरी सु.प्र.मा मिळाली. 11 नोव्हेंबर 2023 रोजी 760 कोटी रूपयांची तृतीय सु.प्र.मा.मिळाली. 21 जून 2017 रोजी 2370 कोटी रूपयांची चतुर्थ सु.प्र.मा मिळाली आहे. तर 8 मार्च 2023 रोजी 5177 कोटी रूपयांची पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पास मिळाली आहे.


निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा 85 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील 13, संगमनेर 43, राहाता 37, श्रीरामपूर 3, कोपरगाव 11 व सिन्नर (नाशिक जिल्हा) 6 असे एकूण 113 गावांमधील 43865 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उजवा कालवा हा 97 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील 11, संगमनेर 37 व राहूरी 21 असे एकूण 69 गावांमधील 20395 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय पाईप कालव्याद्वारे 2328 हेक्टर क्षेत्र व जलाशयावरील उपसा सिंचन योजना 2290 हेक्टर असून असे एकूण 68878 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.


भूसंपादन सद्यस्थिती : – धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी लागणारे 1317.35 हेक्टर क्षेत्र (100 टक्के) ताब्यात आहे. तसेच कालव्यासाठी एकूण संपादन करावयाचे क्षेत्र 1427.36 हेक्टर आहे, ताब्यातील क्षेत्र 1424.09 हेक्टर आहे व संपादन करावयाचे उर्वरित क्षेत्र 3.27 हेक्टर आहे. कालव्यासाठी 3.27 हेक्टर क्षेत्र संपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. ऑगस्ट 2023 अखेर सर्व भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे. असा हा बहुउद्देशीय निळवंडे धरण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यांतील दुष्काळी व जिरायती भागांसाठी जीवनदायी ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख