स्वीफ्ट कार व दुचाकीची जोराची धडक

कारच्या धडकेत युवक ठार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या कारने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.
अनिल हरिभाऊ खुळे (रा. रायतेवाडी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, अनिल हरिभाऊ खुळे हे रायतेवाडी फाटा येथे असणार्‍या गतीरोधकातून दुचाकीवरून जात होते परंतू याचवेळी या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने स्वीफ्ट कारने या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने यात अनिल खुळे यांच्या जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीसांनी अपघातास कतारणीभूत ठरलेल्या कारचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख