दहशत, दादागिरी विरोधात दहा गावांचे निवेदन

0
1928

ग्रामीण भागातील नागरीकांवर दिल्ली नाका, जोर्वे नाका,
पुणे रोडवर नेहमीच दादागिरी, कठोर उपाययोजनांची गरज


युवावार्ता (प्रतिनिधी
संगमनरे –
तालुक्यातील विविध भागातून रोज हजारोंच्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण व विविध कामासाठी संगमनेर शहरात येत असतात. मात्र पुर्वेकडील भागातून येणार्‍या नागरीकांना शहराच्या हद्दीवरील दिल्ली नाका, जोर्वे नाका, पुणा रोड या ठिकाणी विविध समस्यांना, दहशतीला व दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. याच दहशत व दादागिरीतून दोन दिवसांपूर्वी जोर्वे नाका येथे जोर्वे येथील काही तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील रोजच्या दादागिरीला त्रासलेल्या तालुक्यातील तब्बल दहा गावांनी पोलिसांना सामुदायिक ठराव करत व त्याबाबतचे निवेदन देत येथील दादागिरीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.


तालुक्यातील पूर्वेकडील जोर्वे, कनोली, रहिमपूर, निंबाळे, कोल्हेवाडी, कोकणगाव, पिंपरणे, उंबरी बाळापूर, मालुंजे, रायतेवाडी, वाघापूर, जाखुरी, चंदनापुरी यासह अनेक शेजारील अनेक गावांतून शेतकरी, कामगार, विद्यार्थी विविध कामानिमित्त वरील मार्गावरून संगमनेर शहरात येत असतात. मात्र या परिसरात एका सामाजाची लोकसंख्या जास्त आहे. तसेच या परिसरात अनेक हातगाडीवाले, टपरीवाले यांनी अतिक्रमने करून जाणे येण्याचा रस्त्यात अडचण निर्माण केलेली आहे. येथे असलेल्या दुकानांमुळे तेथे सतत 150 ते 200 स्थानिक लोक टोळके करून दुकानासमोर भर रस्त्यात वाहने लावून उभे असतात व वाहतुकीस अडथळा करतात. तसेच तेथे अनेक रिक्षा अवैधपणे उभ्या असतात. याच कारणामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी झालेली असते. येथे जमलेले स्थानिक लोक हे त्यांच्या संख्या बळाचा फायदा घेवून जाणार्‍या येणार्‍या नागरिकांवर विशेष करून हिंदू धर्माच्या नागरिकांवर दादागिरी करणे, जाणीवपूर्वक वाद निर्माण करून मारहाण करणे, महिलांची व विद्यार्थिनीची छेड करणे हे प्रकार सतत्याने करत असतात. नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तेथील लोकांवर व दुकानदारांना प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला नसून, हम करे सो कायदा अशी भावना तेथील लोकांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांच्या वर्तनुकितून स्पष्ट दिसत आहे. येथे स्थानिक लोकांचे टोळके जमणे व त्यांच्या कडून नागरिकांना होणारा दररोजचा त्रास या मागचे प्राथमिक कारण हे तेथे असलेले अतिक्रमणे हेच आहेत.


दरम्यान शहरात रात्री दहा नंतर जवळपास सर्व व्यवहार बंद केले जातात, नाही केले तर पोलीस कारवाई होते. मात्र शहराच्या प्रवेशद्वारावरील या ठिकाणी मात्र रात्री उशिरा पर्यंत दुकाने, व्यवहार व वर्दळ सुरू राहते. मात्र त्याकडे कुणाचे लक्ष नाही. त्यातूनच त्यांची हिम्मत वाढत जाते. या ठिकाणी एखाद्या वाहनचालकाने साधा हॉर्न जरी वाजवला तरी त्याच्यावर धावून जाणे, त्याला मारहाण करणे, गाडीचे नुकसान करणे हे नित्याचे झाले आहे. जर एखाद्या वाहन चालकाने प्रतिकार केला किंवा उलट उत्तर दिले तर या ठिकाणी मोठा जमाव लगेच गोळा होतो व त्या चालकाला मारहाण करुन अपमानित करून हाकलून दिले जाते. हे असे प्रसंग अनेक वेळा या ठिकाणी घडत असतात. त्यातच दोन दिवसांपूर्वी जोर्वे येथील सात ते आठ तरुणांना जोर्वे नाका येथे टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या संतापाचा पारा चढला. त्यामुळे जोर्वेसह निंबाळे, कनोली, रहिमपूर, कोल्हेवाडी कोकणगाव, पिंपरणे, उबंरीबाळापूर, मालुंजे, रायतेवाडी अशा सुमारे दहा गावांनी ग्रामसभा घेऊन या परिसरातील दहशतीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करावी या मागणीसह येथे पोलीस चौकी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली.

6 जून रोजी भव्य मोर्चा
शहरातील जोर्वे नाका येथे एका समाजाकडून जोर्वे येथील तरूणांना बेदम मारहाण झाली. या परिसरात वारंवार ग्रामीण भागातील नागरीकांना व दुसर्‍या समाजातील नागरीकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले जाते. किरकोळ कारणावरू संघटीतपणे हल्ले केले जातात. या विरूद्ध हिंदुत्ववादी संघटनांकडून 6 जून रोजी संगमनेरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेे.

सोळा जण गजाआड, धरपकड सुरुच

शहरातील जोर्वे रस्त्यावरून जाणार्‍या जोर्वे गावच्या आठ तरुणांना मारहाण करत दहशत माजविणार्‍या 16 जणांना अहमदनगर जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा आणि संगमनेर शहर पोलिस पथकाने मुसक्या आवळत गजाआड केले. तर उर्वरित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली.
संगमनेर शहरातील जोर्वे नाक्यावर परिसरातील नागरिकांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी जोर्वे गावाकडे जाणार्‍या पिकप चालकाने गाडीचा हॉर्न वाजविला. याच रागातून त्या परिसरातील तरुणांनी दहशत माजवीत 8 जणांना गंभीर मारहाण केली होती. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सुमारे 150 जणांच्या विरुद्ध सोमवारी पहाटे दंगल घडविणे, दहशत माजविणे यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हेगारांना लवकरात लवकर जेरबंद करण्याबाबतचे आदेश पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना दिले. त्यानंतर लगेचच जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कोंबिंग सर्च ऑपरेशन राबवीत हल्लेखोरांची धरपकड सुरू केली. दोन दिवसात पोलिसांनी नईम कादर शेख, रेहान गुलाफाज पठाण, शेहबाज गफार शेख, आदत सय्यद अन्सार शेहबाज याकुब शेख, मोबीन मुबारक शेख, अमीर रफिक शेख आणि शेख इमरान दुश्मन पठाण, अल्ताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अहमद गुलाब नबी शेख, शकील नासीर पठाण, तोफिक आबू जर बिलाल शेख, शफीक शेख वइस्माईल, निसार पठाण अशा 16 हल्लेखोर आरोपींच्या मुस्क्या आवळत त्यांना गजाआड केले आहे. त्या सर्व हल्लेखोरांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी. देशमुख यांनी या सर्वांना 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here