लग्नास नकार दिल्याने परप्रांतीय मौलानाने केला मुलीच्या बापाचा खून

मालदाडच्या जंगलात सापडलेल्या मृतदेहाच्या खूनाचा उलगडा
डिवाएसपी पथकाने दोन आरोपींच्या थेट उत्तर प्रदेशमधून आवळल्या मुसक्या

युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर- मुलगी दिली नाही म्हणून एका मौलानाने त्याच्या मित्रांच्या मदतीने मुलीच्या बापाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली. ज्याने या परप्रांतीय मौलानाला निवारा दिला त्याच मौलालाने त्या घरातील व्यक्तींचा विश्वासघात करुन त्यांच्या मुलीला विवाहाची मागणी घातली. मात्र, हा मौलाना असल्यामुळे याच्या राहण्याचा निश्चित ठाव- ठिकाणा नाही. पुढे आपल्या मुलीचे काय होणार म्हणून सदर बापाने लग्नास नकार दिला. याचा राग येऊन या मौलानाने तुमने लडकी नाही दि तो मुझे दुसरा भी तरीका आता हैं.! मै तुम्हे बरबाद कर डालूंगा. असे म्हणत मौलानाने ते घर सोडले. नंतर मित्रांच्या मदतीने मुलीचे वडील आहतेशाम इलियास अन्सारी (रा. मदिनानगर, जुना जोर्वे रोड, संगमनेर) यांची मालदाडच्या जंगलात नेऊन हत्या केली. ही घटना दि. ३ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल २०२४ रोजी या दरम्यान घडली. मात्र, पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाने या घटनेचा सखोल तपास केला आणि याप्रकरणी मौलाना मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी (रा. साहरणपुर, उत्तरप्रदेश) मोहंमद इम्रान निसार सिद्दकी (रा. कल्याण) व मोहंमद फैजान शमीम अन्सारी (रा. बगदाद अन्सार, ता. धामपुर, जि. बिजनौर) अशा तिघांवर गुन्हा दाखल करत थेट उत्तर प्रदेशमधून दोघांच्या मुसक्या आवळल्या असून एक पसार आहे.
“ याबाबत सविस्तर माहिती अशी की, आठ महिन्यांपुर्वी उत्तरप्रदेश येथील मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी हे मौलाना चंदा मागण्यासाठी संगमनेर शहरात आले होते. ते जवळच्या एका मशिदीत मौलाना म्हणून काम करीत होते. म्हणून अन्सारी कुटुंबाने त्यांना निवारा दिला होता. या दरम्यान मोहंमद याने अन्सारी यांच्या मुलीसोबत विवाह करण्याची मागणी घातली. मात्र, मोहंमद जाहिद हा परप्रांतीय असून तो मौलाना काम करण्यासाठी सदैव बाहेर असल्यामुळे मुलीचे काय होईल? याचा विचार करुन बाप म्हणून त्यांनी या विवाहाला नकार दिला. तेव्हा मोहंमद याने मुलीच्या बापाला धमकी देत निघून गेला. त्यानंतर तो अकोले तालुक्यातील देवठाण येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करू लागला. त्यानंतर तो कल्याणला गेला. मात्र, अन्सारी यांनी निकाहास विरोध केल्याची सल मोहंमद याच्या मनात कायम होती. त्यामुळे, तो मुद्दाम आहतेशाम अन्सारी यांच्या संपर्कात होता.


त्यानंतर आहतेशाम अन्सारी हे दि. 3 एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गाडी घेऊन बाहेर पडले. त्यानंतर बराच वेळ झाला, दुसरा दिवस गेला तरी ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या मुलांनी संगमनेरात शोध घेऊन नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर दि. ४ एप्रिल २०२४ रोजी अन्सारी यांच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग दाखल केली होती. तर, आरोपी मोहंमद जाहिद याच्याशी पुर्वी कौटुंबिक नाते झाले होते. त्यामुळे, त्याच्यावर शंका घेण्याचे काहीच कारण नव्हते. म्हणून अन्सारी कुटुंबाने मोहंमद जाहिद याच्याशी संपर्क केला आणि आहतेशाम हे घरी आले नाही. ते आधुन मधून तुमच्याकडे कल्याणला येत असे म्हणून तुम्हाला त्यांच्याबाबत काही माहित आहे का? अशी विचारणा केली. त्यावर मोहंमद याने सांगितले. की, ते माझ्याकडे दि. ३० मे २०२४ रोजी आले होते. त्यानंतर आले नाही. दरम्यान मोहंमद जाहिद हे स्वतः मौलाना असल्यामुळे अन्सारी कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे, त्यांना विचारले की, अन्सारी हे कोठे असतील? तेव्हा त्यांनी सांगितले. की, तुमचे वडिल जिवंत असून ते सुखरूप आहेत. लवकरच ते घरी येतील. हे ऐकल्यानंतर अन्सारी कुटुंबियांना धिर आला होता. मात्र, जेव्हा मौलाना मोहंमद जाहिद यांना घरी बोलविले तेव्हा त्यांनी घरी येणे टाळले. अन्सारी कुटुंब त्यांच्यावर विश्वास ठेवून धिर देण्यासाठी, मदत करण्यासाठी संगमनेरला बोलवित होते. मात्र, वारंवार मोहंमद जाहिद हे टाळाटाळ करीत होते. तेव्हाच थोडासा संशय बळावला होता. याबाबत अन्सारी कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांना याबाबत कल्पना दिली होती. फोन केल्यानंतर घाबरल्यासारखे बोलणे, कधी फोन कट करणे, फोन केल्यानंतर बोलण्याचे टाळणे अशा गोष्टी वारंवार होत होत्या. त्यामुळे, थेट पोलिसांनीच मोहंमद जाहिद यास बोलावून घेतले आणि त्याचे जबाब देखील नोंदविले होते.


दि. २४ एप्रिल २०२४ रोजी मालदाड येथील जंगला एक अनोळखी प्रेत सापडल्याची माहिती सोशल मीडियावर आली होती. त्यानंतर अन्सारी यांच्या मुलांनी कॉटेज
हॉस्पिटल संगमनेर येथे जाऊन पाहिले असता हा मृतदेह आहतेशाम इलियास अन्सारी यांचाच असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर अन्सारी यांच्या मुलांनी मौलाना
मोहंमद जाहिद यांना फोन लावून विचारणा केली. की, मौलाना आप बोले थे की अब्बा जिंदा हैं.! तो ऐसे कौसे हो गया? हे एकल्यानंतर मौलाना यांच्याकडून काहीच
उत्तर आले नाही, त्यांनी फोन कट केला. त्यानंतर आहतेशाम अन्सारी यांचा दफनविधी करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी जो पंचनामा केला होता. त्यात अन्सारी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, कोणताही सबळ पुरावा नव्हता. त्यामुळे, प्रथमतः
अकस्मात दाखल करुन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.

या दरम्यान आरोपी मोहंमद जाहिद यास ही घटना समजून देखील तो संगमनेरला त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास आला नाही. त्याचे आपल्या जबाबात सांगितले होते. की, दि. १ ते ३ या दरम्यान कल्याण येथे होतो. मात्र, त्याचे लोकेशन हे संगमनेर दाखवत होते. अशा अनेक संदिग्ध चुका आरोपी मोहंमद जाहिद याने केल्या होत्या. त्यामुळे हा गुन्हा त्यानेच केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वैद्यकीय अहवालानुसार मयत अन्सारी यांच्या अंगावर जखमा आणि गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे व्रण होते. त्यामुळे, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर काही टेक्निकल पुरावे जमा करुन पोलिसांनी पहिल्यांदा मोहंमद जाहिद यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तो सरळ झाला. होय.! मीच आहतेशाम अन्सारी यांची हत्या केली आहे. कारण, त्यांनी मला लग्नास नकार दिला होता. तर ही हत्या मोहंमद इम्रान (रा. कल्याण) व मोहंमद फैजान अन्सारी (रा. बगदाद) यांच्या मदतीने केली होती अशी कबुली दिली. अतिशय अवघड असा तपास सुक्ष्म पध्दतीने करून पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने या खुनाची उकल केली. यामध्ये पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, स.फौ. लोखंडे, पो. ना. राहुल डोके, पो. कॉ. राहुल सारबंदे यांनी ही कामगिरी केली. सर्व सबळ पुरावे जमा करुन पोलिसांनी दोन आरोपींच्या थेट उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या आहेत. तर एक आरोपी फरार आहे. या गुन्ह्याची उकल केल्यामुळे पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख