महसूलमंत्री विखेंना मोठा धक्का‘गणेश’वर थोरात-कोल्हेंचे वर्चस्व

विखे गटाला केवळ एक जागा

संगमनेरसह जिल्ह्यात विजयाचा जल्लोष
आम्ही संसार मोडायला नाही तर जोडायला येतो – थोरात


युवावार्ता (प्रतिनिधी)
राहाता
– संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील गणेश नगर सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या आघाडीने महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांच्या जनसेवा पॅनलचा धुव्वा उडवत गणेश सहकारी साखर कारखान्यावर आपली सत्ता प्रस्तापित केली आहे. या निकालाने राधाकृष्ण विखे यांना मात्र मोठा झटका बसला असून या निकालाचे जिल्ह्यातील राजकारणावर दुर्गामी परिणाम होणार आहे.


मागील आठ वर्षांपासून गणेश साखर कारखान्यावर महसूल मंत्री विखेंची एक हाती सत्ता होती. दरम्यान विखेंनी आपल्या मतदार संघाबरोबरच शेजारील अनेक तालुक्यातील मतदार संघात लक्ष घातल्याने व मंत्री पदाचा वापर केल्याने उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले होते. याच दरम्यान गणेश साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आणि काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे विवेक कोल्हे यांच्या सोबत आघाडी करत गणेशवर सत्ता स्थापनेसाठी व्युव्हरचना आखली आणि जोरदार प्रचार केला. येथील मतदारांनी थोरात कोल्हेंवर विश्‍वास दाखवत मागील आठ वर्षांची विखेंची सत्ता उलथवून लावली. गणेश साखर कारखान्याच्या निवडणूकीने जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असून या निकालाची सर्वत्र चर्चा आहे. दुपार पर्यंत हाती आलेल्या निकालात 19 जागांपैकी पाच जागांवर थोरात- कोल्हे गटाने बाजी मारली होती तर एक जागा विखे गटाला मिळाली. तर उर्वरीत सर्व जागांवर थोरात -कोल्हे गटाचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे गणेशवर थोरात -कोल्हे यांची एकहाती सत्ता येणार आहे.

गणेश कारखान्याच्या १९ जागासाठी शनिवारी मतदान झाले होते. यामध्ये १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सुरवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखली होती. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच सर्व ताकद पणाला लावली होती. तरीही फक्त एका जागेवरच विखे गटाचा उमेदवार निवडून आला आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकत्रित पॅनल असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी सर्वच गटात विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी विवेक कोल्हे यांना साथ दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनीही राहत्यामध्ये सभा घेऊन विखे पाटील यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती.


[4:37 pm, 19/06/2023] Ahire sir: गणेश कारखान्याच्या निवडणुकीत एकूण १९ जागांसाठी रविवारी मतदान झाले. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ निवडणूक रिंगणात उतरले होते तर त्यांच्या विरोधात थोरात – कोल्हे यांचे पॅनल उभे होते. प्रचाराच्या दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार टिका टिपण्णी झाली. गणेश कारखाना निवडणुकीत थोरात आणि कोल्हे यांनी संकेत मोडल्याची टीका पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावर केली होती तर थोरात यांनी विखे यांच्यावर जोरदार टीका करत मतदारांना साद घातली होती. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तुम्ही दुसऱ्यांची घरे मोडायला येता आणि आम्ही जोडायला. आ. थोरातांच्या या भावनिक सादेला मतदारांनी साथ देत गणेश ची सत्ता देखील दिली

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख