इसमाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याचे प्रथम दर्शनी अंदाज आहे
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – घुलेवाडी शिवारातील औद्योगीक वसाहतीजवळील निळवंडे कालव्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना काल गुरूवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत माहिती अशी की, घुलेवाडी हद्दीतील औद्योगीक वसाहती जवळील निळवंडे कालव्यात एका इसमाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह तरंगत होता. ही घटना परिसरातील काही नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलीसांना खबर दिली. त्यानंतर पोलीसांनी क्रनच्या सह्याने सदर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कॉटेज रूग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या अर्धनग्न अवस्थेतील इसमाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे.