बंदी असलेले मांगूर मासे जप्त

३ हजार किलो वजनाचा २ लाख ७० हजारांचा रुपये किमतीचा मांगुर मासे

भारत सरकारने प्रतिबंधीत केलेला मांगुर मासे किंमत २ लाख ७० हजार असा एकूण १० लाख ७० हजाराचा माल हस्तगत

संगमनेर
केंद्र शासनाने बंदी घातलेल्या मांगुर माशाची वाहतूक करताना मत्स विभागाने तालुक्यातील बोटा परिसरात टाकलेल्या धाडीत ३ हजार किलो वजनाचा २ लाख ७० हजारांचा रुपये किमतीचा मांगुर मासे हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनिषा सर्जेराव देसाई (वय ५५, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अहमदनगर) यांना मिळालेल्या माहितीवरून बोटा शिवारात दिनांक २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.पी. ०९ जी. एच. १७१९ मधून बंदी घातलेल्या मांगूर माशाची वाहतूक केली जात होती.
पोलिसांच्या मदतीने सदर सदर टेम्पो नाशिक- पुणे महामार्गावर बोटा परिसरात अडवण्यात आला. त्यात मांगूर माशाची वाहतूक करताना लोणाजी रतनलाल ताड (वय ४५ चालक दलपुरा राजगढ, ता. सरद रपुर, जिल्हा धार राज्य मध्ये प्रदेश ) करण हरी चौव्हाण (वय २९ रा. दलपुरा राजगढ, ता. सरदारपुर, जिल्हा धार मध्ये प्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
विटकरी रंगाचा आयशर (किंमत ८ लाख ) टेम्पो तर ३ हजार किलो वजनाचा काळसर रंगाचा भारत सरकारने प्रतिबंधीत केलेला मांगुर मासे किंमत २ लाख ७० हजार असा एकूण १० लाख ७० हजाराचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
मांगुर माश्यापासुन भारतीय माश्यांच्या प्रजातीला व पर्यावर्णाला धोका निर्माण झाला असल्याने प्रतिबंधित मांगुर जातीचे माशांचे संवर्धन, बीज उत्पादन, पणन व वाहतूक व्यवस्था यांस भारत सरकारने प्रतिबंध केला आहे. हे माहिती असताना देखील वरील चालक व वाहक यांनी प्रतिबंधीत मांगुर मासे वाहतुन करत असताना भारत सरकारच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन त्याचा भंग केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख