रविवार संगमनेरसाठी ठरला घातवार

अपघातात दोघांचा, बुडून दोघींचा तर गळफास घेऊन एकाचा मृत्यू
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-

रविवारी राज्यात एकीकडे सत्येचे महानाट्य घडत असतांना संगमनेरसाठी रविवार घातवार ठरला आहे. विविध दुर्घटनेत दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन तरूणांचा अपघाती, दोन महिलांचा बुडून तर एका तरूणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्रीपासून नगरपालीकेच्या कॉटेज रूग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र या ठिकाणी पुरेशी यंत्रणा नसल्याने व संबंधीत अधिकारी वर्ग नसल्याने मृतांच्या नातेवाईकांचा रोष मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत होता. तसेच मयतांमध्ये तीन तरूणांचा समावेश असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरूणाई संतप्त भावना व्यक्त करत होती.


याबाबत तालुका पोलीस स्टेशनकडून माहिती देण्यात आली. आज सोमवारी गुरूपौर्णिमा असल्याने संगमनेरातून काही तरूण दुचाकीवर रात्री शिर्डीला जात होते. दरम्यान निळवंडे येथे रात्री 11 वाजेच्या दरम्यान मयत अनुकूल सत्यवान मेढे (वय 21, रा. देवीगल्ली, संगमनेर) हा आपल्या मित्रांसोबत रस्त्यावर थांबला असता एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यावेळी त्याच्यासह त्याच्या इतर दोन मित्रांना मार लागला. मात्र यात अनुकूल सत्यवान मेढे याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.


दुसरी घटना कोल्हार घोटी राज्य मार्गावर वडगावपान टोल नाक्यावर काल रविवारी रात्री घडली. अमोल गजानन सानप (वय 30, रा. कर्‍हे, ता. संगमनेर ) वडगावपानकडे येत असतांना एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मेडीकव्हर हॉस्पिटलने खबर दिल्यानंतर तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तिसरी घटना तालुक्यातील जवळे कडलग येथे घडली. याबाबत खबर देणार्‍या शशिकांत प्रभू हांडे यांच्या शेतातील विहिरीवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढले असता या मयत महिलेची ओळख पटली असून तीचे नाव ज्योती संतोष पाटेकर (वय 38, रा. आरेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे निष्पन्न झाले. या प्रकरणी तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चौथी घटना तालुक्यातील पेमगिरी येथे काल रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. संदिप सोमनाथ डुंबरे (वय 38, धंदा शेती, रा. पेमगिरी) यांच्या शेततळ्यात सौ. पुष्पा उत्तम डुबे (वय 42, रा. पेमगिरी) ही पाय घसरून पाण्यात पडल्याने तीचा बुडून मृत्यू झाला. याप्रकणी संदिप डुंबरे यांच्या खबरीवरून तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


तर पाचवी घटना तालुक्यातील निमगांव टेंभी येथे रविवारी रात्री घडली. आश्‍वीन बाबुराव वर्पे (वय 28, रा. निमगाव टेंभी) या तरूणाने आपल्या राहत्या घरात छताला असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास उपचारासाठी शहरातील कुटे हॉस्पिटल येथे आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मयत घोषीत केले.
तालुक्यात काल रविवारी विविध ठिकाणी झालेल्या दुर्देवी घटनेत दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक श्री वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दिघे, पो. हेड. कॉ. एम.आर. सहाणे, हेड कॉ. वायाळ, हेड कॉ. एस.आर बढे, सहाय्यक फौजदार सय्यद आदिंसह कर्मचारी करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख