ला. गिरीष मालपाणी यांच्याकडून 2022-23 च्या संपूर्ण टीमचे कौतुक
हेल्पिंग हॅन्ड युथ ऑर्गनायझेशनला यावेळी भरीव मदत
युववार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचा 18 वा पदग्रहण समारंभ मंगळवार दि. 11 जुलै रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे पार पडला. “We Serve” हे ब्रीदवाक्य मनाशी बांधून सामाजिक कार्य करणाऱ्या संगमनेर सफायर या नावजलेल्या क्लबच्या अध्यक्षपदी अतुल अभंग, सचिवपदी जितेश लोढा तर खजिनदारपदी कल्पेश मर्दा यांची निवड करण्यात आली. पदग्रहण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन एमजेएफ ला. हनुमान अग्रवाल, पीएमजेएफ ला. सीए मनीष लाडगे, माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन ला. गिरीष मालपाणी, माजी अध्यक्ष ला. रोहित मणियार, ला. श्रीनिवास भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित अतिथी आणि नूतन पदाधिकारी यांचे अनोख्या पद्धतीने यावेळी स्वागत करण्यात आले. माजी अध्यक्ष ला. उमेश कासट यांनी सन 2022-23 साली झालेल्या सर्व उपक्रमांचा आढावा यावेळी उपस्थितांना दिला.
प्रवर्तन अधिकारी ला. रोहित मणियार यांनी संगमनेर सफायरमध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या 28 सदस्यांना यावेळी शपथ दिली. प्रमुख अतिथी ला. मनीष लाडगे यांनी आपल्या भाषणात मागील वर्षी झालेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. संगमनेर सफायर हा मोठा क्लब असून गिरीष मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली क्लबने अनेक चांगली कामे केल्याचे त्यांनी सांगितले.
ला. हनुमान अग्रवाल यांनी लायन्स सफायरच्या कामाचे कौतुक केले. क्लबने आता कायमस्वरूपीच्या एखाद्या उपक्रमाला सुरूवात करावी असेही आवजून सांगितले. सन 2023-24 साठी असणाऱ्या संचालक मंडळाला आपआपल्या खात्याची जबाबदारी समजावून सांगितली. नूतन सचिव जितेश लोढा, सहसचिव जितेंद्र पाटील, खजिनदार कल्पेश मर्दा, सहखजिनदार आदित्य मालपाणी, अध्यक्ष अतुल अभंग यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि येणाऱ्या वर्षात चांगल्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ला. गिरीष मालपाणी यांनी 2022-23 च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. धांदरफळ येथे लायन्स सफायची स्वतची जागा असून लवकरच आपण कायमस्वरूपीच्या सामाजिक उपक्रमासाठी या जागेचा वापर करणार असल्याचे सांगितले.
माजी अध्यक्ष उमेश कासट, व्हीपी ला. पूजा कासट, माजी सचिव व्हीपी कल्याण कासट, माजी खजिनदार गौरव राठी यांनी आपल्या पदभाराची जबाबदारी नूतन सदस्यांना सुपूर्त केली.
नूतन अध्यक्ष अतुल अभंग यांचा परिचय ला. नम्रता अभंग यांनी केला. अतुल अभंग यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले. येणाऱ्या कार्यकाळात सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण काही नवीन उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी क्लबमध्ये चांगले काम करणाऱ्या सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार सचिव जितेश लोढा यांनी मांडले.
हेल्पिंग हॅन्ड युथ ऑर्गनायझेशनला यावेळी भरीव मदत
ला. श्रीनिवास भंडारी आणि अध्यक्ष अतुल अभंग यांच्या संकल्पनेतून हेल्पिंग हॅन्ड युथ ऑर्गनायझेशनला यावेळी भरीव मदत करण्यात आली. भटक्या गायी, कुत्रे, मांजर आदी प्राण्यांना संकटाच्या काळात वाचवून त्यांच्यावर सुश्रुषा करण्याचे काम ही संस्था करत असते. या अडचणीच्या काळात त्यांना उचलण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, उपचार करण्यासाठी ज्या यंत्रणेची आवश्यकता असते ती सर्व मदत या वेळी संस्थेचे अध्यक्ष भुषण नरवडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.