गळती रोखण्यासाठी थोरात कारखान्याकडून भरीव मदत

0
1607

दुष्काळी गावातील नागरिकांमधून कौतुक

संगमनेर (प्रतिनिधी)-निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जीवनाचा ध्यास मानून धरण व कालवे पूर्ण केले आहे. या कालव्यांमधून पाणी सोडावे या मागणीला आलेल्या यशानंतर बिना अडथळा व विना गळती हे पाणी सुरू रहावे यासाठी थोरात सह. साखर कारखान्याच्या यंत्रणेने डाव्या कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी रात्रंदिवस केलेल्या मोठ्या मदतीचे दुष्काळी गावातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडून दुष्काळी भागाला दिलासा द्यावा ही मागणी नुकतीच केली होती .यानंतर मागणी व पाठपुराव्याला यश येऊन निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे .

मे महिन्यातही आमदार थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारकडून पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळेस काही ठिकाणी कालव्यांमधून  गळती झाली होती. त्यावेळेसही कागद टाकण्यात आला होता. मध्यंतरीच्या काळात गळती थांबवण्यासाठी  पाटबंधारे विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परंतु यावेळेस अधिक सुरक्षितता म्हणून अशी पाणी गळती होऊ नये व विना अडथळा आवर्तन सुरू राहावे याकरता पाटबंधारे विभागाच्या वतीने डाव्या कालव्यामध्ये प्लास्टिक कागद टाकण्यात आला आहे.

हा प्लॅस्टिक कागद टाकण्याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने कोणतीही प्रसिद्धी न करता रात्रंदिवस अविश्रांत काम करून प्लास्टिक कागद टाकण्यासाठी मोठी मदत केली आहे.

त्यामुळे गळती न होता डाव्या कालव्यातून पाणी लवकरात लवकर पुढे जाऊन जास्तीत जास्त दिवस आवर्तन सुरू राहील याकरता काम होत आहे.

थोरात कारखान्याच्या यंत्रणेने रात्रंदिवस केलेल्या कामाबद्दल आणि प्लास्टिक कागद टाकण्याकरता दिलेल्या मदतीबद्दल डाव्या कालव्यातील लाभक्षेत्रातील नागरिकांकडून कारखान्याचे मार्गदर्शक व धरण आणि कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात ,चेअरमन , संचालक मंडळ, कार्यकारी संचालक,डेव्हलपमेंट विभाग यांसह यंत्रणेचे अभिनंदन होत असून या केलेल्या मदतीमुळे लाभक्षेत्रातील गावांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

जलनायक आ थोरात यांच्या अविश्रांत कामाचे फलित

धरण व कालव्यांचे निर्माते आ. बाळासाहेब थोरात यांनीच धरणाच्या कामाला गती दिली. कोरोना संकट काळातही कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू ठेवले. वेळोवेळी कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळवला. धरणग्रस्त व अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनासह त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध पूल, स्ट्रक्चरल यांची कामे तातडीने पूर्ण केली. दररोज होत असलेला पाठपुरावा यामधून धरण कालव्यांची कामे पूर्ण झाली आहे. यानंतर डाव्या कालव्यातून पाणी सोडावे व उजव्या कालव्याचे कामही तातडीने करून त्या नागरिकांनाही पाणी द्यावे अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे .त्यांच्या अविश्रांत कामाचे फलित म्हणून निळवंडेचे पाणी मिळत आहे अशी भावना दुष्काळी बांधवांमधून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here