सरस्वती पतसंस्थेचे कंपाऊंड तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल

जेसीबीच्या सहाय्याने ताेडले हाेते कंपाऊंड

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील निमज येथील सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या मालकीच्या जागेत संस्थेने केलेले तार कंपाऊंड गावातील काही नागरीकांनी दहशतीचा वापर करून जेसीबीच्या साह्याने तोडून टाकले होते. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चुकीचे भूमापन, चुकीच्या नोंदी, खोटे दस्तऐवज तयार करणारे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना संस्थेच्या वतीने वकीलामार्फत आपल्यावर कायदेशीर कारवाई का करु नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात देखील खळबळ उडाली आहे.
संस्थेचे चेअरमन बादशाह दत्तू गुंजाळ, निमज यांनी व संस्थेचे पदाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार व कागदपत्रावरुन अ‍ॅड. पी. आर. मालपाणी, संगमनेर यांजकडुन ही नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे.


निमज ता. संगमनेर येथील गट नंबर 139/20 क्षेत्र 0=04आर बिगर शेती आकार 20 रुपये ही मिळकत 2/12/77 रोजी विडी कामगार पंच यांनी खरेदी केली. त्याठिकाणी मंगलौरी कौल व पत्र्याची 1726 चौरस फुट इमारतही बांधली व तेथे विडी कारखानाही चालविला. विडी धंदा बंद झाल्याने विडी कामगार पंचानी सदर जागा सरस्वती पतसंस्थेला विक्रीचा निर्णय घेतला. मात्र त्यास समवेत काही गावकुटाळाने अडथळा आणला. त्यानंतर सदर जागा संस्थेने रितसर खरेदी केली. त्यानंतर संस्थेने त्यास कंम्पाऊंड केले. मात्र पुन्हा गावकुटाळांनी सदर प्लॉटचे पुर्वेचे खंडोबा माळ रस्त्यावर प्लॉट झाकला जाईल अशा पध्दतीने बांधकाम केले. याबाबत संस्थेने दावा दाखल केला तो अद्याप प्रलंबित आहे. तसेच संस्थेने आपल्याच जागेवर बांधकाम करण्याचा निर्णय घेतला त्यालाही या गालगुंडानी विरोध केला. तसेच संस्थेची जागा बळकविण्याचा प्रयत्न व कट रचला. सिंधूबाई प्रकाश खाटेकर यांच्या मदतीने बिन तारखेचा मोजणी अर्ज 139/19/1 (जुना 139/14) असा नंबर टाकुन मोजणीचा अर्ज दिनांक 11/11/2022 रोजी दाखल केला तर 28/2/2023 चे संगणीकृत मोजणी अर्जावर कोणाचीही सही नाही. मोजणी अर्जासमवेत जो फाळणी नकाशा जोडला त्यात संस्थेच्या मालकीचा 139/20 हा उत्तर पूर्व कोप-यात आहे. तर 139/19. हा संस्थेच्या प्लॉट पासुन पश्‍चिमेकडे 139/8, 139/7, 139/6 सोहुन नंतर दक्षीण पश्‍चिम कोप-यात आहे. तर 139/14 हा संस्थेच्या प्लॉट पासुन 139/7 139/11, 139/13, 139/22 सोडुन नंतर स्थित आहे, तसा फाळणी नकाशा स्पष्ट आहे.
संस्थेच्या 139/20 चे पुर्वेस रस्ता दक्षीणेस 139/7 पश्‍चिमेस 139/8 व उत्तरेस रस्ता आहे असे स्पष्टपणे सर्व्हेनंबर असतांना 139/20 च्या सिमा याच जणूकाही 139/19 च्या चर्तु सिमा आहे असे दाखवून काही स्थानिक पुढार्‍यांनी स.नं. 139/20 हा संस्थेचा असतांना त्यास बोगस स.नं. 139/19/1 देऊन संस्थेचा बिगर शेती प्लॉट गिळंकृत करणेचे उददेशाने 31/5/2023 रोजी कुणासही नोटीस न देता 492/2023 चा बोगस मोजणी नकाशा बनविला.


निमज गावातील पतसंस्थेच्या विरोधकांना सदर प्लॉटची अभीलाषा आहे. त्यांनी मोठा कट रचून, कागदपत्रे रेकॉर्ड यांचेत अफरातफर करुन बोगस नकाशा बनवून घेतला. संपुर्ण मोजणी रेकॉर्डमध्ये 139/20 चा 139/19 कसा झाला याची कोणतीही कागदपत्रे नाहीत. असे असताना मोजणीदार यांनी स्वत:च्याच मनाने सर्व्हे नं.139/19 व 139/14 हे फाळणी नकाशात दुसरीकडे असताना ते स्वर्हे नं. 139/20 चे ठिकाणी संस्थेच्या बिगरशेती प्लॉटचे ठिकाणी दाखविणेचा प्रयत्न करून जेसीबीच्या सहाय्याने संस्थेचे वॉलकंम्पाऊंड तोडून, पाटी तोडून घुसणेचा प्रयत्न केला. याबाबत संस्थेने दावा दाखल करुन आरोपींविरुध्द मनाई आदेश घेतला आहे. त्यानंतर संस्थेने याबबात भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे कंपाऊंड तोडणारे, काही पुढारी यांना वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
दरम्यान संस्थेचे वॉल कंपाऊंड तोडल्याप्रकरणी गावातील सिंधुतार्ई प्रकाश खाडेकर, रेखा शंकर दातीर, केशर राजेंद्र दातीर आशा चंद्रकांत भोजने, उषा संजय पाबळे, सुनंदा गणेश बुचडे, राधाबाई हरीभाऊ मतकर, विष्णी शंकर बिबवे, यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर परिक्षण भुमापक संगमनेर, छाननी लिपीक, शिरस्तेदार यांच्यासह काही स्थानिक पुढार्‍यांना ही नोटीस बजाविण्यात आली आहे.
सरस्वती ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेते बाबतच्या या प्रकारामुळे सहकार क्षेत्रात संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कारवाई करावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख