गीतकार मुरारी देशपांडे यांच्या गाण्यावर निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

निवडणूक आयोगाच्या युट्युब चॅनेलवरून गाणे प्रसारित करण्याचा बहुमान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सौ शहरी एक संगमनेरी म्हण मुरारी देशपांडे यांनी खरी ठरविली असून अकरा कोटींच्या महाराष्ट्रात एकमेव संगमनेरच्या कवीचे गीत निवडणूक आयोगाच्या नजरेत भरले आहे.
संगमनेरचे सुपुत्र असणार्‍या आणि अनेक वर्षे आपल्या कविता, वात्रटिका, विडंबन गीते, प्रबोधन पर गीते, सामाजिक उपक्रमांची गीते, जनजागृती गीते या माध्यमातून तसेच आपल्या ओघवत्या शैलीतील प्रभावी वक्तृत्वाने विविध साहित्य संमेलने गाजविणार्‍या कविवर्य मुरारी देशपांडे यांच्या मतदार जागृती गीताची दखल थेट राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अधिकृत युट्युब चैनल वरून मुरारी देशपांडे यांच्या परवानगीने हे गीत प्रसारित करण्यात सुरुवात झाली आहे.
थेट निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणि युट्युब चॅनेल वर एखाद्या गीतकाराचे अथवा कवीचे गीत झळकण्याचा हा संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील बहुधा पहिलाच प्रसंग असावा असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कविवर्य मुरारी देशपांडेंवर असामान्य कर्तृत्वाबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आह

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख