Sunday, March 26, 2023

स्मिता गुणे सुषमा स्वराज अवॉर्डने सन्मानित

स्मिता गुणे सुषमा स्वराज अवॉर्डने सन्मानित

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर येथील वजीर अ‍ॅडव्हरटायझींगच्या संचालिका स्मिता गुणे यांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुषमा स्वराज अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


स्मिता गुणे यांनी वजीर अ‍ॅडव्हरटायझींग ही फर्म चालवताना औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात धडपडणार्‍या महिला आणि त्यांची यशाकडे चाललेली वाटचाल या विषयावर लेखन केले आहे. अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, विशेषांकांमध्ये महाराष्ट्रातील विविध यशस्वी महिला अंत्रेप्रेनौर्स विषयीचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘सी ईज द बॉस’ हे त्यांचे पुस्तकही अश्याच काही सक्सेस स्टोरीज सांगणारे आहेत. ’तू मिळव तुझं अवकाश’ हा विषय घेऊन अनेक भाषणे आणि वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे प्रबोधन केले आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर नगर विभागाने एका विशेष कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड
रोहिणी नायडू या मान्यवरांच्या हस्ते स्मिता गुणे यांचा सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केले आहे. पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ. एकता वाबळे-डेरे, दिलशाद सय्यद, प्रतिमा कुलकर्णी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल सौ. स्मिता गुणे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

मुळासह प्रवरा नदीतून बेसूमार वाळू उपसा सुरूच

संगमनेर - वाळू तस्करी रोखल्याचा दावा महसूल मंत्री व प्रशासन करत असले तरी संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या दोन्ही तीरावर वाळू उपसा...

संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  राष्ट्रीय पातळीवर “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धा उत्साहात

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर येथे आयोजित केलेल्या “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धेचे उदघाटन करताना संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, श्री. नरेंद्र...

संगमनेर महाविद्यालयात दिनांक २३ मार्च ला ‘आझाद हिंदची गाथा’ नाट्याचे प्रस्तुतीकरण

युवावार्ता (संगमनेर-प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार...

मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवारपासून प्रारंभ

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवार दिनांक 23 मार्च पासून...