कार्यवाही न केल्यास येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी आपणास ध्वजारोहण करू न देण्याचा दिला होता इशारा
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – शहरातील संजय गांधी नगर, वडार वस्ती व संगमनेर नगरपालिका हद्दीतील सर्वच घरांचे मोजमाप होऊन त्यांना सातबारा आठ अ असेसमेंट उतारा मिळणेसाठी २८/१२/२०२२ रोजी नागरिकांच्या वतीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला उत्तर म्हणून नगरपालिकेने लेखी स्वरूपात मागणी मान्य केली होती. परंतु दिलेल्या आश्वासनांची पुर्तता झाली नाही. पालिका कर्मचारी याबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही. तसेच मुख्याधिकारी म्हणून आपण याबाबत ठोस भुमिका घेत नसल्याने या परीसरातील नागरीकांनी पालिकेवर धावा बोलत जाब विचारला होता. तसेच याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी आपणास ध्वजारोहण करू देणार नाही, तसेच पालिकेसमोर उपोषण करु असा इशारा या झोपडपट्टीतील रहिवाश्यांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख (ठाकरे) अमर कतारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला होता. मात्र मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली. त्यामुळे लवकरच येथील झोपडपट्टीतील रहिवाश्यांच्या आपल्या हक्काचा सात बारा व असेसमेंट मिळणार आहे. अशी माहिती अमर कतारी यांनी दिली.
२८ डिसेंबर २०२२ रोजी संजय गांधी नगर व परिसरातील नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या वतीने सर्व झोपडपट्टी धारकांना सातबारा उतारा ८अ व असेसमेंट उतारा देण्यात यावा या स्वरूपाची मागणी करण्यात आली होती. सदर मागणीबाबत रितसर निवेदन देण्यात आले होते. गेली अनेक वर्षाची झोपडपट्टी धारकांची मागणी असल्याने त्याबाबत लेखी स्वरूपात पुरावे देखील सादर केले होते. २०१५ पासूनचे सर्व अर्ज निवेदन दिले होते, सर्व गोष्टीची माहिती घेतल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी संजय गांधी नगर, वडार वस्ती व इतर परिसरातील सर्व नागरिकांना मालकीचा सातबारा, असेसमेंट देण्यास काही हरकत नाही व आंदोलनकर्त्यांची सर्व मागणी लेखी स्वरूपात मान्य केली होती. परंतु सदर मागणी मान्य करून कोणतीही कारवाई पुढे केलेली नाही. सदर मागणी पूर्ण करून ०८ महिने झाले तरी आपला संबंधित अधिकारी, कर्मचारी कोणीही मा गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी संजय गांधी नगर व इतर परिसरात भटकला देखील नाही.
लेखी उत्तर देऊन देखील आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहात व आमची दिशाभूल करत आहात. आम्ही आपणास आणखी आठ दिवसाची वेळ देत आहोत, तरी आठ दिवसात आपण आमच्या मागणीचा विचार करून योग्य ती कारवाई करून घरांचे मोजमाप घेऊन असेसमेंट उतारा देण्याबाबत कारवाई सुरू करावी. अन्यथा १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आपणास व इतर कोणासही आम्ही झेंडावंदन करू देणार नाही. तसेच नगरपालिकेच्या प्रांगणात उपोषणास बसू. मात्र या नंतर झालेल्या व होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आपली राहील. असा इशारा देखील देण्यात आला. या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी तात्काळ कारवाई सुरू करत दिनांक ०५/०८/२०२३ पासून संगमनेर नगरपालिकेचा मालमत्ता कर असेसमेंट बाबतचा फार्म भरण्यास सुरुवात केलेली आहे. घरोघरी जाऊन नगरपालिकेचे कर्मचारी जोशी व काटे यांच्या वतीने समक्ष पाहणी करून घराचे मोजमाप घेऊन मालमत्ता कराचे फार्म भरण्यास सुरुवात केलेली आहे. याबद्दल नागरिकांच्या वतीने शहर प्रमुख अमर कतारी, मुख्याधिकारी राहुल वाघ व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानण्यात येत आहे.
या बाबत नागरिकात समाधानाची भावना होत आहे लवकरच आपल्याला, आपल्या हक्काचा सातबारा असेसमेंट उतारा मिळणार असल्याच आनंद नागरिकांनी व्यक्त केला, याबाबत मुख्याधिकारी राहुलजी वाघ यांनी डिसेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सातबारा उतारा असेसमेंट देण्याचे कबूल व मान्य केले आहे. त्याबाबत होणारी सर्व कारवाईला सुरुवात झालेली आहे. लवकरच नगरपालिकेची कारवाई झाल्यानंतर नगर येथील संबंधित विभागातर्फे कारवाई होऊन आपणास हक्काचा सातबारा उतारा असेसमेंट मिळेल याची ग्वाही राहुल वाघ यांनी दिली, समस्त नागरिकांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख अमर भाऊ कतारी तालुकाप्रमुख भाऊसाहेब असे व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानण्यात आले यावेळी नामदेव फुल माळी, दीपक कतारी, संजय तडासम, मच्छिंद्र कतारी, दारासिंग कातारी, साहेबराव जाधव, साहेबराव गुंजाळ, कांतीलाल कातारी, वसीम अत्तार, राजू गायकवाड, राजू ठाकरे, प्रकाश चोथवे, सुनील धोत्रे, पिंटू गायकवाड, सरजू कतारी, विक्रम कातारी, प्रशांत खजुरे, फरोज कतारी तसेच संजय गांधी नगर परिसरातील शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते.