पत्रकारास मारहाण करणाऱ्या आमदार विराेधात गुन्हा दाखल करावा संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई संघटनेची मागणी

0
1841

राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणारे आणि नंतर आपल्या गुंडाकरवी हल्ला करणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर बुधवारी दि. ९ रोजी भर चौकात भ्याड हल्ला करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या एका बातमीवरून संतापलेल्या आ. किशोर पाटील यांनी अत्यंत अर्वाच्च, शिवराळ भाषेत महाजन यांना शिविगाळ केली. त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर उभ्या महाराष्ट्रात व प्रसारमाध्यमात संतापाची लाट निर्माण झाली. एक लोकप्रतिनिधीं एवढी शिवराळ भाषा कशी वापरू शकतो असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला. आ. किशोर पाटील यांनी केवळ शिव्याच दिल्यानाहीत तर महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. हे सारं संतापजनक आणि निषेधार्ह आहे.


त्यानंतर गुरूवारी सकाळी काही गुंडांनी पत्रकार महाजन यांच्यावर हल्ला केला. तो व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल झाला. ज्या गुंडांनी हल्ला केला ते देखील किशोर पाटील यांचे कार्यकर्ते होते असा आरोप संदीप महाजन यांनी केला आहे. आरोपींचे आणि किशोर पाटील यांचे मोबाईल संभाषण तपासले तर हा किशोर पाटील यांचाच कट असल्याचे दिसून येईल.
त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की, महाजन यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून या मागचे सूत्रधार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. पत्रकारावर हल्ला करून, होय मीच शिविगाळ केली अशी अरेरावीची भाषा नॅशनल टीव्हीवर वापरून पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आ. किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सर्व प्रमुख संघटना एकत्र येऊन राज्यात उग्र आंदोलन करतील.


राज्यात वर्षभरात जवळपास ५० पत्रकारांवर विविध ठिकाणी हल्ले झाले आहे. मात्र जाणीवपूर्वक पत्रकार संरक्षण कमजोर केल्यामुळे माध्यमांची होत असलेली मुस्कटदाबी चिंताजनक असून आम्ही हे कदापिही सहन करणार नाही. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं कायद्याचा धाक कोणाला उरला नाही. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेस द्यावेत ही विनंती आहे.
आपण या विषयात जातीने लक्ष घालून चौथ्या स्तंभाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं योग्य ती पाऊल उचलाल अशी अपेक्षा आहे.
कळावे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे, राज्य उपाध्यक्ष नरेंद्र लचके, राज्य समन्वयक मनोज आगे, संघटनेचे सचिव अरविंद गाडेकर, पत्रकार किशोर आव्हाड यांच्या सह इतर पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here