राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी कपिल पवार

मुंबई येथे देण्यात आले नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी संगमनेर येथील कपिल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते कपिल पवार यांना मंगळवारी मुंबई येथे हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, आमदार किरण लहामटे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कपिल पवार अजित पवार गटात सहभागी झाले. त्यामुळे शरद पवार गटाकडून कपिल पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांची अजित पवार गटाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. कपिल फवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष म्हणून पक्षात संघटना पातळीवर मोठे काम केले आहे. सुरवातीपासून ते अजितदादांचे जवळचे सहकारी राहिले आहे. पक्षात झालेल्या फुटीनंतर देखील ते अजितदादा यांच्या सोबत राहिले. त्यामुळे पुढील निवडणुकींच्या पाश्वभूमीवर त्यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आ. आशुतोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, अविनाश आदिक, दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख