शहरांच्या सांडपाण्यामुळेप्रवरेची होतेय गटारगंगा

0
1728

पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली चिंता

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर सह्याद्रीच्या कुशीतुन उगम पावणारी प्रवरा नदी पुढे शेतकर्‍यांसाठी जीवनदायिनी ठरली. दुसरे महायुद्ध सुरू असतांना तत्कालीन इंग्रज सरकारने बांधलेल्या भंडारदरा धरणाचे पाणी शेतकर्‍यांना आणि येथील उद्योगांना मिळु लागले. त्यातील डावा आणि उजव्या कालव्यामुळे हे पाणी सर्वत्र फिरले. प्रवरा नदीच्या कडील सर्व गावांना, शेतकर्‍यांना नियमित पाणी मिळु लागले. परतू आज शहरांच्या सांडपाण्यामुळे प्रवरेची गटारगंगा होतांना दिसते.

kajale


प्रवरा नदीवर अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा असे तालुक्याची ठिकाणे असुन छोटे मोठे गावे आणि शहरे आहेत त्यांना नियमित पाणी पुरवठा करणारी प्रवरा नदी आता अमृतवाहिनी झाली आहे पण याच नदीला आता गटारगंगेचे स्वरुप आले आहे. वाढत्या आधुनिकतेच्या जगात मानवनिर्मित सांडपाणी, घनकचरा, शहरातील गटारे, मृत व्यक्तीच्या रक्षामुळे वाळुच्या दोन कणामधील अंतर कमी होत आहे. गटारांवर उभ्या असणार्‍या मुतार्‍या त्यामुळे जलप्रदूषण होते तसेच नदी पात्रातील अमर्याद वाळु उपसामुळे पात्रातील खड्यात गटारीचे डबके निर्माण होत आहे आणि याच डबक्यातील पाणी पाझरुन नदी पात्रातील विहीरीत उतरत आहे. संगमनेरातील म्हाळुंगी नदी तर गटार नालाच झाली आहे आणि नाटकी नाल्यातुन अनेक उद्योगाचे विषारी सांडपाणी आणि रक्तमिश्रित पाणी नदी पात्रात वळविले गेले आहे.

Rajhance

हे पाणी नदीतील अनेक विहिरीत पाझरते. सायपन पाईप लाईनच्या माध्यमातून ते शेतात पोहोचल्यामुळे जमिनीचा पोत देखील खराब होत पिकांची नासाडी होते. धरणातुन गोड पाणी सोडले असतांना पुढे ते क्षारयुक्त का? होते याचा शोध घेण्याची गरज आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली असून जनतेने शोष खड्याचा जास्तीत जास्त वापर करावा असा सुर उमटत आहे. कारण शोषखड्यातील पाणी 15 फुटाच्या खाली पाझरत नाही आणि शहरात उथळ विहिरी नाही. याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा जलप्रलय सारख्या आणि रोगराईचा लवकरच सामना करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here