बाप लेकाचे देशी जुगाड…बनवलं आत्याधुनिक कोळपणी यंत्र

बापलेकाने बनवलेल्या या बहुउपयोगी यंत्राची सर्व दूर चर्चा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
ग्रामीण भागात देखील संशोधक वृत्ती दडलेली असते फक्त त्या कल्पनाशक्तीला वाव मिळाली की ते आपोआप सहज शक्य होते. असाच एक अनोखा शोध संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचोली गुरव येथील शेतकरी बापलेकाने आपला वडिलोपार्जित वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळत आधुनिकतेला तंत्रज्ञानाची जोड देत कल्पनाशक्तीच्या जोरावर शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असे अवघ्या 30 ते 40 हजार रुपयात कोळपणी यंत्र बनवले आहे.


हे अत्याधुनिक कोळपणी यंत्र बनवण्यासाठी त्यांना साधारणपणे 2 महिन्याचा कालावधी लागला. या यंत्राला पुढच्या बाजूने 5 एच.पिचे इंजन बसवले असून ते स्वयंचलित चालण्यासाठी त्याला अ‍ॅक्सीलेटर सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता येणार्‍या काळात हे यंत्र शेतकर्‍यांना किफायतीशिर ठरणार आहे. चिंचोली गुरव येथील अतिशय सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रामनाथ सोनवणे व समाधान सोनवणे या बापलेकाने आपला छोटासा वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळात असतानाच कुठेतरी शेतकरी बांधवांचे कष्ट कमी व्हावे तसेच त्यांचे शेतात कमी वेळात जास्त काम व्हावे आणि पैशाचे देखील बचत व्हावी यासाठी एक आगळेवेगळे आत्याधुनिक कोळपणी यंत्र तयार केलें आहे.ह्या यंत्राद्वारे आपल्या शेतामध्ये असणारे सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांची कोळपणी तर होणारच आहे. परंतु आपल्या शेतात वाफे अथवा सरी पाडण्यासाठी देखील या यंत्राचा उपयोग होणार असुन फवारणी मशीन देखील या यंत्रावर बसवणार असल्याचे बाप लेकाने सांगितले आहे. त्यामुळे या बापलेकाने बनवलेल्या या बहुउपयोगी यंत्राची सर्व दूर चर्चा होताना दिसून येत आहे. पुढील काळात हे पिता-पुत्र शेताची नांगरणी व पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना परवडेल असा अत्याधुनिक पद्धतीचा ट्रॅक्टर ते बनवणार असल्याचा मानस यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

Rajhance

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख