राजेंद्र राहणे यांची मुंबई प्रादेशिकविभाग मुख्य अभियंतापदी निवड

0
1203

निवडीचे सार्वजनिक बांधकाम विभागासह संगमनेर तालुक्यात स्वागत

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवासी व सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले ज्येष्ठ अभियंता राजेंद्र राहणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या मुख्य अभियंतापदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे सार्वजनिक बांधकाम विभागासह संगमनेर तालुक्यात स्वागत होत असून विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ज्येष्ठ अभियंता असलेले राजेंद्र राहणे यांनी सुरवातीला येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्य म्हणून भरीव काम केले.

त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. संगमनेर, नाशिक, मंत्रालय, मुंबईसह अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वरीष्ठ पदावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. नाशिक-पुणे महामार्ग, जलजीवन मिशनचे अनेक कामे यासह संगमनेर विभागातील अनेक कामांना मंत्रालय स्थरावर मंजूरी मिळून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अनुभवाने राज्यात अनेक मोठमोठे रस्ते, महामार्ग, शासकीय वसाहती, शासकीय प्रकल्प उभारले गेलेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या रिक्त असलेल्या व अनेक ज्येष्ठ अभियंत्यांची या पदावर नजर असताना संगमनेर मातृभूमी असलेल्या राजेंद्र राहणे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here