संगमनेरात धावती बस पेटली

बस पेटली


वेळीच आग विझल्याने मोठा अनर्थ टळला
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर बसस्थानकातून अकोल्याला जाण्यासाठी निघालेल्या एस टी बसने बसस्थानक परिसरातच पेट घेतला. बसला लागलेली आग वेळीच लक्षात आल्याने व येथील रिक्षाचालकांनी तात्काळ धाव घेत ही आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास नवीन अकोले रोड वळणावर घडली.
गेल्या काही दिवसांपासून धावत्या एस टी बस त्यातही शिवनेरी सारख्या आराम बस पेटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करताना प्रवाशांना एकप्रकारे धडकी भरू लागली आहे.

दरम्यान आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकातून अकोले जाण्यासाठी बस क्रमांक एम एच १४ बीटी ०५६८ प्रवाशांना घेऊन निघाली. ही बस बसस्थानकातून बाहेर पडून नवीन अकोले रोडकडे वळण घेत असतानाच बसच्या इंजिनने पेट घेतला. त्यामुळे आतील प्रवाशांचा भितीने एकच गोंधळ उडाला. बस चालकाने बस बाजूला घेतल्यानंतर प्रवाशांनी तात्काळ बसमधून खाली उड्या मारल्या. याच ठिकाणी रिक्षा थांबा असल्याने रिक्षाचालकांनी तात्काळ धाव घेत बसच्या वायरिंग तोडून टाकल्या व पाणी माती याचा फवारा मारत ही आग विझवली. दरम्यान बसला आग लागल्याचे समजताच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाल्याने काही वेळ येथे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहतूक पोलीस श्री. नवले यांच्यासह पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत नागरीकांना बस ढकलत नेऊन बाजूला नेली. त्यानंतर अग्निशमन दलाचे वाहण घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने काही वेळ बसस्थानक परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख