दरोडेखोरांचा गोल्डन सिटीत धुमाकूळ

दरोडेखोरांचा धुमाकूळ


बंद घर फोडून ४८ हजारांचा ऐवज लुटला
युवावार्ता (प्रतिनिधी)
दरोडेखोरांचा काहिसा थांबलेला धुमाकूळ घातल्यानंतर काल पुन्हा एकदा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने शहरातील गोल्डनसिटी परिसरात दोन बंगले फोडले. यातील एका बंद बंगल्यातून सुमारे सव्वा तोळ्यांच्या दागिन्यांसह आठ हजार रुपयांची रोकड लंपास केली, तर बंद असलेल्या दुसर्‍या घरात उचकापाचक करणाऱ्या दरोडेखोरांच्या हाती काहीच सापडले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास शहरातील गोल्डनसिटी या प्रचंड गजबलेल्या व विस्तारलेल्या परिसरात घडली. हातात लाकडी दांडके घेवून या परिसरात शिरलेल्या सहा दरोडेखोरांनी वसाहतीत सर्वत्र फिरुन अनेक घरांची तपासणी केली

. चोरीसाठी सोयीच्या घरांचा अंदाज घेवून दरोडेखोरांनी घर निवडले. दरोडेखोरांनी निवडलेल्या या दोन्ही घरांमधील रहिवाशी बाहेरगावी गेल्याने त्यांनी डाव साधला. यात साहेबराव अरगडे यांचे घर फोडून सहा दरोडेखोरांनी घरात सर्वत्र उचकापाचक केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा फिर्यादी निलेश बादशहा रहाणे यांची बहिण सुजाता रहाणे यांच्या बंद असलेल्या बंगल्याकडे वळविला. या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरातील सामानाची उचकापाचक करीत घरातील कपाटांत ठेवलेले सव्वा तोळे वजनाचे व 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि आठ हजारांची रोकड असा एकूण 48 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.


दरम्यान गोल्डनसिटी परिसरात दरोडेखोर शिरल्यानंतर कुत्री मोठ्याने भूंकत असल्याने पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांना जाग आली. त्यांनी आपल्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहीले असता त्यांना सहा सशस्त्र दरोडेखोर बाजूलाच असलेल्या त्यांच्या बहिणीच्या बंद असलेल्या घरात दरोडा घालीत असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याला फोन करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार फोन करुनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सातपुते यांनी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना दरोडा पडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर पंधरा मिनिटांनी शहर पोलिसांचे वाहन गोल्डनसिटीत पोहोचले.
आज पहाटे घडलेल्या दरोड्याच्या प्रकाराबाबत निलेश बादशहा रहाणे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख