स्वच्छ-सुंदर संगमनेरात नद्या बनल्या गटारगंगा

एस टी पी प्लांटला विराेध, मग पर्याय काय ?

गटारगंगांमुळे नागरीकांचे आराेग्य धाेक्यात

युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी)
नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. सोबतच शासनाकडून आलेल्या निधीचा वापर करत शहरात चौका चौकात स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी पथनाट्य करून जनजागरण केले. पण ’स्वच्छ संगमनेरसुंदर संगमनेर’ हि संकल्पना केवळ कागदावरच पहायला मिळत आहे. संगमनेरची रक्तवाहिन्या असलेल्या प्रवरा, म्हाळुंगी नद्यांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या दोन्ही नद्या गटारगंगा होतांना पहाणे पर्यावरण प्रेमींसाठी संतापजनक असून नागरीकांच्या आरोग्यासाठीही घातक आहे.


केंद्र सरकार नद्यांकडे स्वच्छतेबाबत गांभीर्यपूर्वक पहातअसून शहरात मात्र नगर पालिकाच शहरातील गटारीचे पाणी शहरालगत असलेल्या म्हाळूंगी नदीत सोडताना दिसत आहे. भल्या पहाटे फिरायला येणार्‍या नागरिकांना गटारीची दुर्गंधीयुक्त वास सहन करावा लागत आहे. म्हाळूंगीच्या काठी असलेल्या साईनगर मधील नागरीकांंना गटारीची दुर्गंधीमुळे परिसरात साथीच्या रोगांनाकारण ठरत आहे. म्हाळुंगी नदीवरील पुल पडल्याने नागरिकांंची खुपगैरसोय होत असून याभागात मोठी शाळा असल्याने किमानचारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना कसरत करावी लागते. सफाई कामगार काही भागात दोन दिवसाआड रस्ता स्वच्छतेला जातात तर अरोग्य अधिकारी फक्त गाडीवरून फिरताना दिसतात. त्यांना गाडीवरून अस्वच्छ रस्ते दिसत नाहीत का? मोकाट कुत्रे दिसत नाहीत. ते फक्त वरिष्ठांच्या पुढे पुढे करण्यात मश्गुल असतात व फुशारक्या मारत फिरत असतात. त्यामुुळे सामान्य नागरिक सुध्दा म्हणतात ’अस्वच्छ संगमनेर विद्रूप संगमनेर ’

शहरातील गटारांचे पाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांच्या विहीरींचे पाणी दुषित झाले आहे. आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने 100 कोटी रूपयांचा एसटीपी प्लँट उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र स्थानिक व विरोधकांनी यात राजकारण करून हा प्लँट बंद पाडला. जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत शहरातील गटारीचे पाणी हे नदीत मिसळणारच. त्यामुळे या प्रश्‍नात केवळ राजकारण न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे महत्वाचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख