विठ्ठल पाडेकर यांच्या कर्तृत्वावर आधारित”कॅंडीमॅन” पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

साहित्यिक अच्युत गोडबोले, साहित्य अकादमी युवा साहित्यिक पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्‍वर्य पाटेकर, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते कँडीमॅन पुस्तकाचे प्रकाशन युवावावार्ता (प्रतिनिधी)
अकोले –
निश्‍चित ध्येयपूर्तिसाठी नियतीशी दोन हात करणारे, विकासाची तळमळ, तत्परता आणि तन्मयता याला उद्योगशिलतेची जोड देऊन व्हि. पी. फूडस्च्या माध्यमातून भारतातील फळप्रक्रियेतला पायोनियर ठरलेले विठ्ठल पाडेकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित कँडीमॅन या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि.27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. अंजली गोधाजी अंत्रे यांनी हे पुस्तक शब्दबद्ध केले आहे.
रविवार 27 रोजी सकाळी 10 वाजता विठ्ठल लॉन्स, देवठाण रोड, अकोले या ठिकाणी हा पुस्तक प्रकाशन सोहळा होत असून ख्यातनाम साहित्यिक अच्युत गोडबोले, साहित्य अकादमी युवा साहित्यिक पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्‍वर्य पाटेकर, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते कँडीमॅन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड असणार असून प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. किरण लहामटे, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, मा. आ. वैभव पिचड, सीताराम पा. गायकर, मा. आ. शरद दादा सोनावणे, सुनीता राजे पवार, मधुकरराव नवले उपस्थित राहणार आहे.


विठ्ठल पाडेकर यांनी विशिष्ट ध्येय मनाशी बाळगून शेती, फळबागामधून उद्योजक होण्यासाठी धडपड सुरू केली. अनेक संकटे आली, वादळे आली परंतु पाडेकर यांनी या संकटावर मात करून आज विविध प्रकारच्या कँडी उत्पादनात आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. सुरूवातीला भारतातील विविध भागातून आवळे खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून विविध चाचण्या घेतल्या. यश-अपयशाचा सामना करतांना त्यांनी विविध रेसिपीज शोधल्या. त्यानंतर मुथाळणे येथे स्वत:च्या मालकीच्या खडक माळरानावर त्यांनी आवळ्याची शेती केली. केवळ आवळा कँडीवरच न थांबता आवळा कोकम सिरप, आवळी चटणी, सुपारी, विविध प्रकारचे ज्युस, लोणचे, मुरांबा यासारखी उत्पादनेही बाजारपेठेत आणाली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, अडचणीतील शेती कशी सावरायची, वाढती बेरोजगारी कशी थोपवायची या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या प्रेरणादायी पुस्तकात मिळणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्ही पी. फुड्स् आणि परिवाराने केले आहे.


व्यावसायाच्या सुरूवातीलाच विठ्ठल पाडेकर यांनी स्वत:च उत्पादन निर्मिती, मार्केटींग, सेल्स, रिकव्हरी आदी कामे वन मॅन आर्मी प्रमाणे सांभाळली. आवळ्याचे पदार्थ तयार करणे ही बाब सोपी नव्हती. अनेकवेळा प्रयोग अयशस्वी झाले मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन विठ्ठल पाडेकर यांनी स्वत:चे नविन रेसिपीज तयार केल्या आणि संपूर्ण भारतामध्ये आवळा कँडी निर्मितीचा पाया घातला. नव्या पिढीतील राजेश पाडेकर आणि ऋषीकेश पाडेकर या भावडांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेऊन आवळ्यापासून अनेक प्रोडक्ट तयार करीत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व्हि. पी. फुडस् हे ब्रँण्ड पोहचविले. अत्याधुनिक मशिनरी आणि वैविध्यपूर्ण मार्केटींग स्ट्रॅटेजीज यामुळे हे दोनही बंधू न्यूट्रामला हे नाव जगभर पोहचवतील यात शंका नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख