शेतीच्या वादातून उभ्या पिकावर मारले तणनाशक

0
1701

फिर्यादिच्या तक्रारी वरून तालुका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शेतीच्या वादातून शेजारच्या शेतकर्‍याच्या फ्लॉवरच्या उभ्या पिकावर तणनाशक औषध फवारुन उभे पिक जाळून टाकले. तसेच याचा जाब विचारला असता कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा संतापजनक प्रकार तालुक्यातील निमज येथे 6 ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी फिर्यादिच्या तक्रारी वरून तालुका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत फिर्यादी भाऊसाहेब रामनाथ कासार (रा. निमज, ता. संगमनेर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात म्हंटले आहे की, फिर्यादी कासार आपली पत्नी, आई, दोन मुले, भाचा असे एकत्र निमज येथे राहत असून त्यांची सर्व्हे नंबर 2/3 मध्ये शेती आहे. त्यांच्या शेजारीच बादशाहा भाऊराव कासार यांची शेत जमिन आहे. भाऊसाहेब कासार यांनी आपल्या शेतात फ्लावरचे पीक घेतले होते तर बादशाहा कासार यांनी ऊसाचे पीक घेतले आहे. सर्व्हे नंबर 11/19 च्या बांधावरून भाऊसाहेब कासार व बादशाहा कासार यांच्यात वाद सुरू आहे. याबाबत कोर्टात खटला प्रलंबीत आहे. दरम्यान 6 ऑगस्ट 2023 रोजी भाऊसाबे कासार आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील फ्लावर पीक सुकलेले आढळून आले. तेंव्हा त्यांना शेजारील ऊसाच्या शेतातील गवतही सुकलेले दिसले.

यावरून ऊसाच्या शेतात असलेल्या शकूंतला कासार यांना याबाबत विचारणा केली असता यावेळी तेथे विलास कासार, मिना कासार आले. त्यांनी उलटपक्षी उत्तर देत जर तणनाशक उडाले असेल तर तुमचे तुम्हा पाहून घ्या असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच मागील प्रमाणे माणसे आणून तुमच्या कुटूंबाला संपून टाकून असा दम दिला. अशी फिर्याद भाऊसाहेब कासार यांनी दिली आहे. दरम्यान शेताच्या बांधावरून असलेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या शेतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे परिसरात याप्रकरणी संताप व्यक्त होत असून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. शेती व बांधाच्या भांडणावरून अनेकवेळा काही शेतकरी असा आघोरी उद्योग करीत असतात. याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here