पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते केंद्र सरकार पुरस्काराने सन्मानित.
अहमदनगरच्या सुकन्या व मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांना डी. जी. इंसिंगानीया हा केंद्र अतिशय सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांचा कार्य परिचय वाचकांना देत आहोत .
नावाप्रमाणेच कामातही तेजस्वी असलेल्या तेजस्विनी सातपुते अहमदनगर जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या शेवगाव येथील आहेत. आई कृष्णाबाई प्राथमिक शाळेत शिक्षिका तर वडील बाळासाहेब सातपुते हे व्यावसायिक. तेजस्विनी यांच्या व्यक्तिमत्त्वावर आई-वडिलांचा मोठ्या प्रभाव आहे. वडील अतिशय कृतिशील विचारी असल्याचे तेजस्विनी सांगतात. आई-वडिलांचे लग्न झाले तेव्हा दोघेही अकरावी शिकलेले. अकरावीतून शिक्षण थांबवून घरच्या कामात गुंतवणूक घेतलेले सर्वसाधारण कष्टकरी होते. आईला शिक्षणाची आवड असल्याने वडिलांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतही आईला शिक्षण घेऊ दिले. लग्नानंतर वडिलांनी आईस शिकण्यास जे उत्तेजन दिले ते आमच्या कुटुंबाच्या परिवर्तनाचे केंद्र आहे.
तेजस्विनी सातपुते यांच्या कुटुंबाचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील साकेगाव. त्यांचे आजोबा पोस्टात नोकरीवर असल्याने सातपुते कुटुंब शेवगावलाच स्थायिक झाले. त्यांची जळण घडण एका सामान्य कुटुंबातल्या मुलीमुलांप्रमाणेच झालेली. फरक फक्त आई शिक्षिका असल्याने अभ्यासाविषयी आई सजग व आग्रही होती. त्यामुळे अभ्यासातील गोडी व प्रगती टिकून राहिली. वडील व्यवसायात असल्याने त्यांचा भर व्यवसाय ज्ञानावर अधिक होता. त्यामुळे व्यवसायातील जग व पुस्तकातील जग यांची सांगड कायम होत राहिली
तेजस्विनी सातपुते 2012 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलातील आतापर्यंतच्या विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय उपक्रम हाती घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी उत्तमपणे बजावली आहे. गुन्हेगारीशी संबंधित असा शिक्का असलेल्या समाज घटकांचे पुनर्वसन, पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त, सैनिकांसाठी एक दिवस पोलिसांसाठी कोविड सेंटर, पोलीस कॅन्टींग चे आधुनिकरण, वाढदिवसाला पोलीस अंमलदाराला सुट्टी यासह ऑपरेशन परिवर्तन या उपक्रमातून त्यांनी पोलीस दलाला अधिकाधिक कार्यक्षम आणि समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजामध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याबरोबरच पोलीस कर्मचार्यांचे नीतीधैर्य उंचावण्यासाठी या उपक्रमाची मदत झाल्याने अनुभवास आले. सातपुते यांनी करिअरच्या वाटेत फक्त गुण मिळवण्याला फारसं महत्त्व कधीच दिले नाही. त्याऐवजी प्राप्त परिस्थितीतीत यशस्वी होण्यासाठीचे कठोर प्रयत्न त्यांनी केले.
वैमानिक निर्मलजीत सिंग यांच्या 1971 च्या युद्धातील बलिदानावर आधारित एक धडा होता. या धड्यांमध्ये त्यांनी वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. खूप अभ्यास करून त्या दहावीत तालुक्यात पहिल्या, जिल्ह्यात दुसर्या तर पुणे विभागाच्या बोर्डात गुणवत्ता यादीत आल्या. त्यानंतर अकरावीच्या सायन्सला प्रवेश घेतला. याच काळात त्यांना चष्मा लागला. चष्मा लागलेल्या व्यक्तीला पायलेट होता येत नाही, ही माहिती सत्य आहे, असे समजून पायलट होण्याचे स्वप्न दिले. आजूबाजूंच्या विषयी नेमकी योग्य ती माहिती देणारे कोणी नव्हते. त्यानंतर त्यांनी बायोटेक चा पर्याय निवडला. बारामतीला शिकत असताना भावी शास्त्रज्ञ आणि ’नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च’ मधील संस्थेतून देशातून दहा विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली. दरवर्षी त्या दोन महिने बँगलोरला जायच्या. तिथे अनेक नावाजलेल्या शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम त्यांना करता आले. संशोधनांना अनेक गोष्टी करता आल्या. बायोटेक ची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. तेव्हा त्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली. यूपीएससी, एमपीएससी, आयएएस क्षेत्र समजून घेताना या विषयाचे कुतूहल वाढत गेले. निर्णयप्रक्रियेच्या त्या भाग होत गेल्या. आता या टप्प्यांवर करियर बनवणे व घरच्यांशी समजुत घालणे हे काम जिकरीचे होते.दृढ निश्चय करून स्पर्धा परीक्षा करिअर विषयी अधिक जबाबदारीने त्या विचार करायला लागल्या.
यूपीएससी 2011 ची पूर्व परीक्षा दिली. यूपीएससीच्या मुलाखतीला थोडं दडपण होतं ते म्हणजे भाषेच. अर्ज भरताना मुलाखतीसाठी मराठी भाषेचा पर्याय निवडला. मुलाखतीच्या अंतिम टप्पा पार करीत शेवटी चार मे 2012 रोजी यूपीएससीचा निकाल लागला आणि 198 वी रँक आली. त्यांना आयपीएस ही सर्वोत्तम संधी
मिळाली. व महाराष्ट्र केडरही मिळाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणाचा (प्रोबेशन ) कालावधी जळगावमध्ये झाला.पहिली स्वतंत्र्य नियुक्ती जालना जिल्ह्यामध्ये मिळाली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये सीआयडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढे पुणे ग्रामीण पोलीस दलात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून संधी मिळाली. पुण्यामध्ये वाहतूक उपायुक्त असताना त्यांनी राबवलेल्या प्रयोगाची देशभरात माध्यमांनी दाखल घेतली. यामुळे हेल्मेट वापरणार्यांमध्ये प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. या काळात अपघाताचे प्रमाण कमी झाले. सातार्यातील पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना रोज अनेक पिढीत लोकांची प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात सातारा येथे दीड वर्ष कार्यरत असताना कोरोना मारामारी पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजेच पाच दिवसात ’जम्मू ऑक्सिजन कोविड सेंटर’ उभारण्यात केलेल्या तेजस्विनी सातपुते यांनी पुढाकार घेतलेला हा राज्यातील एकमेव प्रयोग ठरला. तसेच सोलापूर येथील पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी राबवलेल्या ’ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमाची दखल घेत ’पीएम अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिकडमिस्ट्रेशन’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.पुरस्कार मिळवणार्या त्या देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्या मुंबई येथे डीसीपी म्हणून कार्यरत असून त्यांना नुकताच केंद्रीय गृह विज्ञानाच्या ब्युरो व पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट कडून (बी.पी.आर.एन.डी. )हा दरवर्षी दिल्या जाणार्या ’डीजी इंसिंगानीया ’हा सन्मान महाराष्ट्र केडारच्या ’आयपीएस ’ तेजस्विनी सातपुते यांना जाहीर झाला, असून हा आपला अहमदनगर जिल्ह्याच्या अभिमान सर्वांना प्रेरणादाई ठरला आहे.
त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस दैनिक युवावार्ता परिवाराच्या शुभेच्छा !
शब्दांकन
जयश्री पाटील
संगमनेर