वाहन मालकांच्या शोधात पोलीस

तालुका पोलीस आणि गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
विविध कारणांमुळे पोलीस ठाणे आवारात अनेक वाहने वर्षानुवर्षे धुळ खात पडून असतात. मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर संगमनेर तालुका पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवत मागील चारच दिवसात तब्बल 125 बेवारस वाहनांचे मुळ मालक शोधून त्यांची वाहने त्यांना परत देण्यात आले. यात गुन्ह्यातील वाहन, अपघातातील वाहणे यांचा समावेश आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांबाबत वाहन प्रकार, चेसी क्रमांक, इंजीन क्रमांक, वाहन मालकाचे नाव, पत्ता / वाहन यादी लावण्यात आलेली आहे त्यानुसार वाहन मालकांनी 15 दिवसात आपली ओळख पटवुन आपले वाहन घेवुन जावे असे आवाहन संगमनेर तालुका पोलीसांनी केले आहे. या उपक्रमाचे वाहन चालक/मालक व नागरीकांकडुन कौतुक होत आहे.


पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो वाहने विवीध गुन्हे, अपघात व बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासुन पडून आहेत. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहणांचे मालक मिळुन येत नसल्यामुळे ही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक वर्ष मालकाचे प्रतिक्षेत धुळ खात पडुन आहेत. वर्षेनूवर्ष वाहन मालक वाहन नेण्यास येत नाही. त्यामुळे या वाहनांचे भंगारात रूपांतर होते. तसेच परिसरात मोठी अडचण निर्माण होऊन इतर समस्या उद्भवतात. या पार्श्‍वभुमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पुढाकार घेत बेवारस वाहणांचा शोध घेवून ही वाहने मुळ मालकाचे ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले होते

. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस स्टेशन यांनी विवीध गुन्ह्यातील व अपघातातील वाहन मालकांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यासाठी पोलीसांनी परंदवाडी तालुका मावळ जि. पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम विनायक उदावंत यांची मदत घेतली. पोलीसांनी बेवारस वाहनांचे चेसी नंबर व इंजीन नंबर वरुन वाहनांच्या मुळ मालकांचा शोध लावला. मुळ मालकाचा शोध घेण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि विक्षाधीन पोलीस उप अधीक्षक शिरीष वमने, काँ. शशिकला हांडे, पो.ना.बाबासाहेब खेडकर यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबसाहेब बागडे, संजय काळे व भारत वाघ यांनी परिश्रम घेतले.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडलेली वाहने वाहन मालकांनी घेवुन जावीत. जे वाहने घेवून जाणार नाहीत त्यांची वाहने बेवारस समजुन सरकारी प्रक्रिया पुर्ण करून लिलाव केला जाणार असल्याचे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि पोलीस उप अधीक्षक शिरीष वमने यांनी सांगीतले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख