खासगीकरण व कंत्राटी भरती विरोधात शनिवारी संगमनेरात जनआक्रोश

शासकीय, निमशासकीय संघटनांसह पालक, विद्यार्थी यांचा सहभाग

संगमनेर – महाराष्ट्र सरकार शिक्षणाच्या खाजगीकरणासह विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय राबवित आहे. या जुलमी व अत्याचारी निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यातील विविध शासकीय, निमशासकीय संघटनांसह विद्यार्थी पालकांचा सहभाग असलेला भव्य जन आक्रोश मोर्चा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वा यशोधन कार्यालय येथून निघणार असून प्रांत कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.
विद्यार्थी, पालक, शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अनेक भूलथापा देऊन 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेवर आले. दरवर्षी दोन कोटी नोकर्‍यांचे आमिष दाखवणार्‍या या सरकारने अनेक सरकारी कंपन्या बंद करून त्याचे खाजगीकरण केले आहे .
आता नव्याने शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणासह विविध विभागात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा जुलमी निर्णय घेतला आहे. यामुळे गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहणार असून भविष्यात गरीब आणि श्रीमंत अशी मोठी दरी निर्माण होणार आहे.


शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटी प्रक्रियेला समाजामधून मोठा विरोध होत असून हा जुलमी निर्णय थांबवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, शिक्षकेतर संघटना , सर्व अकॅडमी, आरोग्य, तलाठी, ग्रामसेवक संघटना, सर्व अंगणवाडी, लिपिक संघटना, शेतकरी, सरपंच, बिडी कामगार, आदिवासी, बांधकाम कामगार, वारकरी संघटना, संस्था व्यवस्थापन, अधिकारी,कर्मचारी संघटना, सर्व सहकारी बँका, सरकारी बँका, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत सरकारने घेतलेल्या खासगीकरण व कंत्राटीकरणाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला. तसेच याविरूद्ध तीव्र संघर्ष करण्यासाठी शनिवारी संगमनेरात भव्य जनआक्रोश मार्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
संगमनेरमध्ये शनिवारी सकाळी 11 वा. यशोधन कार्यालय येथून हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. नाशिक – पुणे हायवे वरून संगमनेर बस स्थानकावरून प्रांत कार्यालयावर हा जन आक्रोश मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकणार आहे. या जनआक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व सेवाभावी संघटना, विद्यार्थी, पालक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख