फिर्यादीवर गोळीबार करणारा पोलीस कॉन्स्टेबल कोल्हारमध्ये जेरबंद

0
1466

तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्यात यश

सदर आरोपी हा संगमनेर अकोले परिसरातील असून घटना घडल्यानंतर तो संगमनेर, अकोले तालुक्यात लपला आहे अशी माहिती संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घारगाव व अकोले पोलीस स्टेशनला निर्देश देत आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवले होते. मात्र आरोपी हा सातत्याने आपले लोकेशन बदलत असल्याने तो या पथकाला सापडू शकला नाही. आज मात्र डीवायएसपी मिटके यांच्या पथकाने कोल्हारमध्ये या पोलीस हवालदाराच्या शस्त्रासह मुसक्या आवळल्या.

युवावार्ता (प्रतिनिधी)
शिर्डी – ठाणे ग्रामीण मधील पडघा पो.स्टे च्या हद्दीमध्ये दि. 13/10/2023 रोजी रात्री 09.30 सुमारास मैदे गावाजवळ ता. भिवंडी येथे पोलीस कॉन्स्टेबल सुरज देवराम ढोकरे याने फिर्यादी अजिम अस्लम सय्यद आणि त्याचा आतेभाऊ फिरोज रफिक शेख यांच्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अजिम यांच्यावर 6 आणि फिरोज यांच्यावर 2 गोळ्या सरकारी ग्लॉक 19 Made in USA या पिस्तूलातुन झाडल्या. त्याबाबत पडघा पो.स्टे गुर.नं 533/23 भारतीय दंड संहिता 307, भारतीय हत्यार कायदा 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगरकडून नाशिकच्या दिशेने जात असल्याबद्दल माहिती पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांना मिळाली. त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्याकरिता तीन पथके तयार करून कोल्हार येथे नाकाबंदी लावण्यात आली आणि आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक 19 पिस्तुलासह कोल्हार बस स्टँडवरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपी हा मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालय टठढ मध्ये आर्मरर या पदावर कार्यरत आहे. आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, एपीआय युवराज आठरे, योगेश शिंदे, बाबासाहेब लबडे, दिनेश चव्हाण, सुरेश पवार, एकनाथ सांगळे, भाऊसाहेब आव्हाड, रवींद्र मेढे, निलेश धाधवड, अशोक शिंदे, श्याम जाधव, दिनेश कांबळे, अमोल फटांगरे चालक वर्पे व चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे, होम हारदे, होम अभिजित साळवे, होम विशाल राऊत, होम गणेश साळुंके यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here