अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या प्रा. स्वाती भोंडे व प्रा. गणेश पुरी यांना पीएचडी प्रदान

राज्यस्तरीय आविष्कार प्रोजेक्ट स्पर्धेसाठी शोध निबंधाची निवड

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्यूटर विभागातील  प्रा. स्वाती भोंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तर प्रा. गणेश पुरी यांना कोनेरू लक्ष्मीः विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली. डॉ. पुरी  यांनी “प्रायवसी प्रीझरविंग दिस्त्रीबुटेड फ्रेमवर्क टू मीटीगेट द रीस्क ऑफ प्रायवसी अटॅक ओन इलेक्ट्रॉनिक हेल्थ डेटा” या विषयावर प्रबंध सादर केला. डॉ. पुरी यांना इलेक्ट्रॉनिक आरोग्य डेटावरील गोपनीयतेच्या हल्ल्यांचा धोका कमी करण्यासाठी गोपनीयता संरक्षित करणे वितरित फ्रेमवर्क ह्यासाठी सुलभ प्रणालीची रचना केली. त्यांना डॉ. डी. हरीथा (प्राध्यापक, संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी ,के.एल.विद्यापीठ, विजयवाडा) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. पुरी यांनी २ पेटंट , ४ स्कोपस, २ युजीसी जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहे. प्रा . भोंडे यांनी “प्रेदिक्टीव मॉडेलिंग इन ओन्कोलोजी केयर युजिंग प्रिसिजन मेडिसिन” या विषयावर प्रबंध सादर केला. 

डॉ. भोंडे यांनी औषधामधील तंतोतंतपणा जिनसंच प्रोफाइल्स वापरून कॅन्सर केअरमध्ये भविष्यसूचक मॉडेलिंग हे शोधण्यासाठी सुलभ प्रणालीची रचना संशोधनात केली. त्यांना डॉ. शर्मिला के. वाघ (प्राध्यापक, मॉडर्ण सी.ओ.ई.,पुणे) व डॉ. जयश्री.आर. प्रसाद (प्राध्यापक, एम.आय.टी ए.डी.टी, विद्यापीठ,पुणे ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे संशोधन त्यांनी श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय , पुणे येथुन  केले. ह्या संशोधनात त्यांना डॉ. परीक्षित मह्हले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. भोंडे यांनी ३ कॉपीराईट, ३ एससीआय जर्नल, ४ स्कोपस जर्नल ला शोधनिबंध प्रकाशित केले आहे. तसेच त्यांच्या शोध निबंधाची निवड राज्य स्तरीय आविष्कार प्रोजेक्ट स्पर्धेसाठी झाली आहे.

पीएचडी प्रदान झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात , विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे ,डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.के.सोनकर व सर्व शिक्षक – विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख