सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्यध्यापिका प्रा. नम्रता पवार लाेकनेते बाळासाहेब थाेरात शिक्षक गाैरव पुरस्काराने सन्मानित

शिक्षण क्षेत्रातील भरीव याेगदानाबद्दल निवड

रविवार दिनांका 03/09/2023 राेजी बी.एस.टी.महविद्यालय येथे हाेणार पुरस्कार वितरण साेहळा

संगमनेर
येथील जनआरोग्यम परिवार आयोजित जाणीव फाउंडेशन संगमनेर, ता.संगमनेर यांचे वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार 2023 च्या आदर्श शिक्षक पुरस्कार येथील सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नम्रताताई पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती जाणीव फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमित पाटणकर यांनी दिली.


मुख्याध्यापिका नम्रताताई पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळवला आहे. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मुळ पाया आहे. आणि हा पाया भक्कम करण्यासाठी पवार मॅडम आपले संपूर्ण योगदान देत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, संस्कारक्षम मुले घडावी यासाठी आनंददायी शिक्षण देण्याकडे एक मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा नेहमी कल असतो. त्यांचे शैक्षणिक योगदान लक्षात घेऊन या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 03/09/2023 रोजी दु. 02.00 वा. के. बी. दादा देशमुख सभागृह, बी.एस.टी. महाविदयालय संगमनेर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
आम्हास अभिमान आहे की हा शिक्षक गौरव पुरस्कार आपल्या शैक्षणिक अध्ययन अध्यापनात एक नवसंजीवनी ठरावा. आपण नक्कीच समाजाप्रती प्रेरणास्थान आहात. अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल नम्रताताई पवार यांचे दंडकारण्य अभियान, गीता परिवार जनआरोग्यम परिवार हिर्वांकुर परिवार यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख