संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेरात होत असलेल्या रिमझीम पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुर्दशा झाली आहे. दरम्यान अवघ्या काही महिन्यांपुर्वी तयार करण्यात आलेल्या कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील दिल्ली नाका (तीन बत्ती चौक) येथील रस्त्याची चाळण होऊ लागली आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचत असल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत असून वाहने यात आदळून खराब होत आहे. इतके मोठमोठे खड्डे पडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकचे याकडे लक्ष नाही.
डांबरी रस्त्याबरोबरच सिमेंट काँक्रेट रसत्यावरही खड्डे पडल्याने या निकृष्ठ कामाचा पडदाफाश झाला आहे. या ठिकाणी वाहनांची रोज मोठी वर्दळ असूनही संबंधित विभागाचे या खड्ड्यांकडे लक्ष नसल्याने नागरीक, वाहनचालक संताप व्यक्त करत आहे. शहरातील खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी सुरू असून याही खड्ड्यांवर अशी मलमपट्टी कधी होणार असा प्रश्न नागरीक विचारत आहे.