पुणे विद्यापीठात प्रथमच रोबोटिक्स विषयात पीएचडी
संगमनेर ( प्रतिनिधी ) गुणवत्ता हे शिक्षणाचे वैशिष्ट्य राखणाऱ्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील ऑटोमेशन अँड रोबोटिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विलास बाबुराव शिंदे यांनी पुणे विद्यापीठात प्रथमच रोबोटिक्स विषयात पीएचडी मिळवली असून व जिमखाना विभागाचे प्रा. सुनील अंबरनाथ सांगळे यांना पीएचडी मिळाली आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या हस्ते डॉ विलास शिंदे व डॉ सुनील सांगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समवेत व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम ए व्यंकटेश. अकॅडमीक डायरेक्टर डॉ जे बी गुरव, डॉ बी एम लोंढे ,डॉ मनोज शिरभाते, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, प्रा जी.बी. काळे, प्रा. एस.टी. देशमुख ,श्रीमती शितल गायकवाड ,प्रा नामदेव गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने देशपातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. एन बी ए मानांकनासह नेकचा अ प्लस दर्जा इंजिनिअरिंग कॉलेजला मिळवला असून स्वच्छता, निसर्गरम्य परिसर, शिस्तप्रिय वातावरण, उत्कृष्ट निकाल, याचबरोबर संशोधन पर शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना शिक्षकांनी अधिक संशोधन करावे याकरता प्रोत्साहन दिले जात असून रोबोटिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा विलास शिंदे यांनी पुणे विद्यापीठातून रोबोटिक्स या विषयात प्रथमच पीएचडी मिळवताना मोशन प्लॅनिंग ऑफ हायर टॉप रोबोट्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग एप्लीकेशन मल्टी ऑब्जेक्टिव्ह ऑप्टिमायझेशन या विषयांमध्ये प्रबंध सादर केला. आज स्पर्धा वाढली आहे व प्रत्येक इंडस्ट्री हि ऑटोमॅशन अँड रोबोटिक्स याकडे जात आहे. कमी वेळेत व कमीत कमी energy वापर करून जास्त प्रोडक्टिव्हिटी व कार्यशामता इंडस्ट्रियल रोबोट ची वाढविणे हे या संशोदानाचे मुख्य नियोजन होते या साठी 25+ इंडस्ट्रीचा सर्वे केला व त्यामध्ये लक्ष्यात आलेल्या रोबोटिक टेकनॉलॉजि चा वापर करतांना येणाऱ्या मुख्य वेळ व energy बाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी ऑप्टिमिझाशन आणि AI टेकनिकचा वापर केला. त्यासाठी सहा वेगळे रोबोट वापरण्यात आले व वेगळ्या वेगळ्या ऑप्टिमिझाशन टेकनिक चा वापर केला. त्यांना नाशिक के के वाघ येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ पी जे पवार यांचे मार्गदर्शन लाभले.तर सुनील सांगळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून हँडबॉल या विषयातून पीएचडी मिळवली आहे.
याबद्दल डॉक्टर शिंदे व डॉक्टर सांगळे यांचे विधिमंडळ पक्षनेते माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात मा. आमदार डॉ सुधीर तांबे विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, ॲड अरबी सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, ,इंद्रजीत भाऊ थोरात, विलास वरपे, संपतराव गोडगे, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य प्रा व्ही बी.धुमाळ, डॉ एम ए वेंकटेश सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.