पिंपरणे गावात एसटीबस पलटी, शाळकरी मुले जखमी

सर्व मुलांवर संगमनेर येथे उपचार सुरू

दैनिक युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर- म्हैसगाव (राहुरीहून) निघालेली बस आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे येत असताना पिंपरणे गावाजवळ बसचा एक्सल तुटल्याने बस पलटी झाल्याने दुर्घटना घडली. बसमधली सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


आज सकाळी राहुरी एस टी महामंडळाची बस (क्र एम एच 07 सी 9146) राहुरी शकडून संगमनेरकडे निघालेली बस आश्वी, शिबलापूर मार्गे संगमनेरकडे येत होती. या बसमध्ये शहरात शिकण्यासाठी येणारे अनेक विद्यार्थी प्रवास करत होते. सदर बस पिंपरणे गावामध्ये आली असता, अचानक बसचा एक्सेल तुटल्यामुळे बस पलटी झाली. यात बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी तात्काळ संगमनेरला पाठवलेले आहे.
पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख