मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संगमनेरात शुक्रवारी शांती मोर्चा

राज्य सरकारची भूमिका हिंसाचार करणाऱ्यांना समर्थन देणारी ?


संगमनेर… मणिपूर येथील हिंसाचाराने आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरीक अस्वस्थ झाले आहेत. गेले ८४ दिवस मणिपूर अशांत आहे.केंद्र व राज्यसरकार मणिपूर मध्ये शांतता निर्माण करु शकलेले नाहीं. सरकारने तेथील इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे दहशत वाढली आहे. सुमारे साठ हजार नागरिक बेघर झाले आहेत.१५०स्त्री पुरुष मारले गेले आहेत. ३ मे २०२३ रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्याची धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना मागील आठवड्यापर्यंत देशाला समजली नाही. सरकारने आरोपींवर कारवाई केली नाही. बेटी बचाव, बेटी पढाव म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी या विषयावर मौन धारण केलेले होते. अत्याचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत होते. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर नरेंद्र मोदींनी या घटनेवर भाष्य केले. त्यात मणिपूर मधील हिंसाचाराचे गांभीर्य दुर्लक्षित करुन पंतप्रधानांनी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील हिंसक घटनांचा दाखला दिला.केंद्र व राज्य सरकारची भूमिका हिंसाचार करणाऱ्यांना समर्थन देणारी आहे.


मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध जाहीर केला आहे. शुक्रवार२८ जुलै २०२३ रोजी संगमनेरच्या शांतता प्रिय स्त्री पुरुष नागरिकांचा शांती मोर्चा आयोजित केल्याची महिती समाजवादी जन परिषदेच्या ॲड.निशा ताई शिवूरकर आणि महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी दिली आहे. संगमनेर बस स्टँड जवळील दत्त मंदिरापासून दुपारी एक वाजता निघणाऱ्या या शांती मोर्चात नागरिकांनी मोठया संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे, संगमनेर पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पा. शिवाजी लांडगे, कारभारी देव्हारे, प्रा. शिवाजी गायकवाड, ॲड ज्ञानदेव सहाणे, विनोद गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, बाबा खरात, बाबुराव गायकवाड, इंदुमती घुले इत्यादींनी केलें आहे.

गुरूवारी महिलांचा निषेध मोर्चा
मागील तीन महिन्यांपासून अशांत असलेल्या मणिपूर मधील हिंसाचार व महिलांवर झालेले अत्याचार याविरुद्ध संपूर्ण भारतभर संतापाची लाट निर्माण झाली असून अशा विकृत मनोवृत्ती विरुद्ध व या हिंसाचारांच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक 26 जुलै रोजी संगमनेर बसस्थानक समोर दुपारी 3 वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मणिपूर मधील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. गुन्हेगारीला जात धर्म पंथ काही नसून तो मानवतेचा दुश्मन असतो. मणिपूर मध्ये सध्या महिलांविरुद्ध मोठे अत्याचार होत असून संपूर्ण भारतात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस अमानवीय घटना घडत आहेत.या विकृत मनोवृत्तीचा देशासह जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख