मालमत्ता कर व पाणी कराचा वेळेत भरणा करा अन्यथा कारवाई – राहुल वाघ

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेचा वसुली विभाग शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील सुरू

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगर परिषद हद्दीतील ज्या मालमत्ता धारकांकडे सन 2023 – 2024 अखेर मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी आहे अशा मालमत्ताधारकांनी कराची रक्कम त्वरित भरण्याचे आवाहन नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने सन 2023 -2024 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात येत असून नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी संजय पेखळे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कर निरीक्षक साजिद पटेल, कर अधिकारी दत्तू साळवे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ यांसह नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग असलेले वसुली पथक नियुक्त केले असून या पथकाद्वारे विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात येत आहे. जे थकबाकीदार मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या रकमेचा भरणा करणार नाही अशा थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे, यांसह कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले.
तरी नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या मालमत्ता व पाणीपट्टी कराची रक्कम नगर परिषदेत त्वरित भरून होणारी संभाव्य कारवाई टाळावी व नगर परिषदेत कराचा वेळेत भरणा करून नगरपरिषद सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. तसेच नागरिकांची कर भरण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेचा वसुली विभाग शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख