मेडिकव्हर हॉस्पिटल आणि अकोले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0
1462

वजन, ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, ई सी जी तसेच इतर अनेक राेगांवर तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले

अकोले
अकोले मेडिकल फाउंडेशनयांच्या वतीने व मेडिकव्हर हॉस्पिटल आणि अकोले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तहसील कार्यालय अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


गुरूवार दिनांक १५/०२/२०२४, रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अकोले हॉस्पिटल, अकोले येथे हे शिबीर घेण्यात आले. मेडीकव्हर हॉस्पिटलचे नामांकित तज्ञ डॉ सुशांत गिते
MBBS DNB (medicine), कन्सल्टंट फिजिशियन डॉ. वैभव कांबळे MBBS MS Mch (Urology) कन्सल्टंट युरो सर्जन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात वजन, ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, ई सी जी (डॉक्टर सल्यानुसार) तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गुलाबराव पाटील (पी.आय.अकोले पोलीस स्टेशन), बाबासाहेब दातखिळे (मंडळ अधिकारी), भानवसे गणेश (नायब तहसीलदार), श्री. भोर (पंचायत समिती), डॉ.सुशांत गिते सर (MBBS, DNB), डॉ.वैभव कांबळे सर (Urology) डॉ. अद्वैत देशपांडे सर (बालरोग तज्ञ), डॉ. तुषार गावडे सर (स्री रोग तज्ञ), भानुदास वाकचौरे, सौ. रुपाली वाकचौरे (सचिव, अकोले मेडिकल फाउंडेशन, डॉ. प्रकाश वाकचौरे (अध्यक्ष, अकोले मेडिकल फाउंडेशन), विक्रम सुर्वे तसेच हॉस्पिटल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here