नागरीकांचा जीव धाेक्यात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील रायतेवाडी छत्रपती चौक, बायपास मध्यभाग सर्कल जवळ नेहमी 5 ते 7 फ्लेक्स लावलेले असतात. त्यामुळे पलीकडे असलेले वाहने दिसत नाही. त्यामुळे मोटर सायकल, चारचाकी वाहनांचे अपघात होतात. या अपघातात बरेच जण मृत्युमुखी पडले असून तात्काळ बोर्ड काढून घ्यावे, तसेच तेथील हायमॅक्स एलइडी लाईट दुरुस्ती करावा. अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा बजरंग दलाने हिवरगाव टोल नाका प्रशासन व संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर खुर्द, रायतेवाडी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील, प्रांत कार्यालय येथे निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे व परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.