संगमनेरच्या लावणी सम्राज्ञी पवळा हिवरगावकर यांचे तमाशा लोककला राज्य पुरस्कारास नाव ; नामचंद पवळा यांचे जन्मगावी स्मारक होण्यासाठी सरकारने निधी द्यावा

पवळा हिवरगावकर

संगमनेर (प्रतिनिधी)
राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या कलावंताना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील तमाशा क्षेत्रात विशेष व भरीव योगदान देणार्‍या कलावंताला संगमनेर तालुक्यातील पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या नावाने राज्य सरकारने सांस्कृतिक पुरस्काराची घोषणा केली आहे.


तमाशा क्षेत्रातील रंगमंचावर काम करणारी पहिली महिला म्हणून पवळा यांचा सन्मान करण्यात येतो. त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केल्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या कर्तुत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. तथापी त्यांच्या गावी कायमस्वरूपी स्मारक उभे राहावे, यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी तमाशा कलावंतांकडून करण्यात येत आहे. विविध कलांमध्ये बहुमूल्य योगदान देणार्‍या कलाकारांचा यथोचित गौरव व्हावा, म्हणून तसेच विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या लोककल्याणकारी योजनांचे महामहीम व्यक्तींच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा शासनाने केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणार्‍या ‘सांस्कृतिक पुरस्कार’ व वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन’ योजनच्या नामांतरास शासनाने मंजूरी दिली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कारास पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर पुरस्काराचे नाव देण्यात आले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणार्‍या कीर्तनकार यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत शिवराज उर्फ रामदास महाराज किर्तन-समाजप्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्या मानधन योजनेस राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहेत.

नामचंद पवळा या स्टेजवर प्रथम नृत्य करणार्‍या महिला होत्या. ज्या काळात महिला कलाक्षेत्रात स्टेजवर नृत्य करत नव्हत्या. अशा काळात पवळा यांनी धाडसाने नृत्य सादर केले. महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर पोचवण्याचे काम त्यांनी केले. आज त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानावर परदेशातील अभ्यासक संशोधन व लेखन करीत आहेत. अशा महान कलेच्या सम्राज्ञीच्या स्मृती जतन करण्यासाठी नामचंद पवळा यांचे भाचे कलाभूषण लहूजी नामदेव भालेराव यांनी कला सम्राज्ञी पवळा कला मंच संस्थेची स्थापना केली. स्मारकासाठी संस्थेने
५डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाकडे राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव दाखल केला आहे. स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु दीर्घकाळापासून सदरचा प्रस्ताव प्रलंबित असून, कार्यवाही विना २ वर्षापासून प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे. नामचंद पवळा मागासवर्गीय समाजाच्या असल्याने शासन दरबारी उपेक्षा होत असल्याची खंत त्यांचे पणतू नितीनचंद्र चांगदेव भालेराव यांनी व्यक्त केली. नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकास महाराष्ट्र शासनाने तात्काळ निधी द्यावा अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव, सचिव नितीनचंद्र भालेराव यांच्यासह सोमनाथ भालेराव, बाळासाहेब भालेराव, अभिजित भालेराव, काशिनाथ पावसे, यादवराव पावसे, सुभाष गडाख, गणेश दवंगे, सचिन सस्कर, सुयोग भालेराव, भाऊसाहेब निळे आदींसह हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील पवळाबाई हिवरगावकर यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तमाशा लोकरंगभूमीवर पदार्पण करून तमाशातील पहिली स्त्री-कलावंत होण्याचे धारिष्ट्य दाखवले. त्या महान कलावतीचे स्मरण यानिमित्ताने दरवर्षी होणार आहे, ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.
– डॉ. संतोष खेडलेकर, तमाशा अभ्यासक आणि माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार समिती

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख