मुरारी देशपांडे आणि सर्वेश देशपांडे यांची विडंबन गीते प्रचंड व्हायरल

युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सऍपमध्ये काका-पुतण्या जोडीचा बोलबाला


मिश्किल शैलीत काव्यलेखन व गीतलेखन करून मागील वीस वर्षे समाज प्रबोधन करणारे रसिकप्रिय वात्रटिकाकार कवी मुरारी देशपांडे यांच्या दोन ताज्या विडंबन गीतांनी राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. लाखोंच्या संख्येने शेअर झालेल्या या धमाकेदार विनोदी राजकीय विडंबन गीतांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयातही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. येथील जवळपास प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, मंत्र्यांचे पी ए अशा सर्वांच्याच मोबाईल मध्ये ही गाणे वाजत आहेत. सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी संगमनेर च्या देशपांडे काका पुतण्यांचेच नाव आहे.

गाण्यांसाठी QR स्कॅन kara


मुरारी देशपांडे आणि त्यांचा पुतण्या सर्वेश यांनी या गीतांच्या माध्यमातून उडवून दिलेली धमाल पाहून मंत्रीमंडळ इमारत पोट धरून हसत आहे. “सौ शहरी आणि एक संगमनेरी” ही म्हण देशपांडे काका पुतण्यांनी खरी ठरवून संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. असंख्य संगमनेरकरांनी तसेच मराठी नाट्य चित्रपट संगीत क्षेत्रातील नामवंतांसह राजकीय नेत्यांनी देखील खास फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे
फुटला ग बाई फुटला या गीता नंतर देशपांडे काका पुतण्याने सादर केलेले “ सतरंज्या उचलू पुन्हा” या गाण्याने तर अक्षरशः कहर केला आहे. साध्या भोळ्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना ‘ सतरंजी’ गीतातून मांडण्यात यशस्वी झाल्याने हे गीत डबल धमाका करणारे ठरले.
कोविड महामारीच्या संकटात देखील सामाजिक बांधिलकी च्या भूमिकेतून कविवर्य मुरारी देशपांडे आणि सर्वेश देशपांडे यांनी सादर केलेले कोरोना जनजागृती गीत जगाच्या कानाकोपऱ्यात जागरूक नागरिकांनी पोचविले होते. प्रत्येक संगमनेरकरांची छाती अभिमानाने फुगून घ्यावी आणि मान उंच व्हावी अशी ही अभिमानास्पद कामगिरी देशपांडे काका पुतण्यांनी पुन्हा एकदा करून दाखविली आहे. 

या कलेचा वापर सामाजिक कामासाठी जास्त व्हावा – संगमनेरकरांची मागणी कविता, विडंबन गीते ही अनोखी कला मुरारी देशपांडे यांच्याकडे आहे. सर्वेश देशपांडे हेदेखील उत्कृष्ट गायक असून हार्मोनियम सुद्धा छान वाजवितात.
ज्या विषयांतून वाद-विवाद होतील अशा गोष्टी टाळून या कलेचा वापर यापुढे सामाजिक कामांसाठी व जनजागृतीसाठी अधिक व्हावा अशी मागणी संगमनेरच्या जनतेतून होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख