इमॅजिकाकडून इर्शाळवाडी दुर्घटनेत मदतीचा हात


उद्योजक मनिष मालपाणी व जय मालपाणी यांच्याकडून माणुसकीचे दर्शन


युवावार्ता (विशेष प्रतिनिधी) संगमनेर – दि -21 जुलै रोजी रायगड येथील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी यथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्त हानी झाली. या दुर्घटनेत अनेक माणसे आणि जनावरे मातीच्या ढिगार्‍याखाली अडकले होते. ही बातमी समजताच इमॅजिकाचे संचालक मनिष मालपाणी व जय मालपाणी यांनी त्वरीत इर्शाळवाडी येथे आपले कर्मचारी मदतीसाठी पाठवले. रात्रीचा काळोख आणि धो-धो पडणारा पाऊस या अडचणीतही मालपाणी परिवाराने दाखवलेल्या तत्परतेमुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे. यावेळी एनडीआरएफचे जवान, जवळील रहिवासी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मदत करत होते.


इमॅजिकाचे सर्वेसर्वा मनिष मालपानी व जय मालपाणी यांना समजली असता त्यांनी इमॅजिकाचेचे सीओ धिमंत बक्षी व सीएफओ मयुरेश कोरे यांनी इमॅजिका पार्कमध्ये असणारे अत्यावश्यक सेवा कर्मचारी वर्ग तसेच सुरक्षा रक्षक यांना त्वरित घटनास्थळी जाऊन जास्तीत जास्त मदत करण्याचे आदेश द्यायला सांगितले. धिमंत बक्षी इमॅजिका सीईओ यांनी लगेचच तसे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार इमॅजिकाचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन कर्मचारी, डॉक्टर्स तसेच इतर विभागाचे कर्मचारी अमित पाटील, युवराज व प्रमोद यांच्या नेतृत्वाखाली 75 ते 85 कर्मचारी इर्शाळवाडी येथे पोहचले. त्यांच्या समवेत अ‍ॅम्ब्युलन्स, ओषधे, मदत कार्यासाठी लागणारे अत्यावश्यक साधन सामुग्री तसेच तेथे दोन दिवसांपासून मदत कार्यासाठी असलेले 500 ते 600 एनडीआरएफ जवान व शासकीय कर्मचार्‍यांसाठी जेवण घेऊन पोहचले.


इमॅजिकाच्या या आपत्कालीन टीमने तेथे पोहचल्यावर लगेचच आपल्या चार तुकड्या करून एनडीआरएफ टीम बरोबर मदत कार्य चालू केले. दुर्घटना झालेल्या ठिकाणी पडलेले मातीचे ढिगारे, कोसळलेली घरे आणि त्यामध्ये अडकून पडलेले मृत माणसं, मृत जनावरे बाजूला काढली व जेवढी आणि जशी शक्य होईल तेवढे एनडीआरएफ जवान आणि पोलीस कर्मचारी यांना मदत केली. संध्याकाळी मदत कार्य संपवून इमॅजिकाची टीम खाली आली.
मालपाणी परिवार हा केवळ उद्योग, व्यवसायातच नव्हे तर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यात आघाडीवर आहे. देशभरातील अनेक कठीण प्रसंगी हा उद्योग समूह तन मन धनाने पुढाकार घेत असल्याने व इर्शाळवाडीतील कठीण प्रसंगात धावून गेल्याने सर्व स्तरातून मालपाणी उद्योग समूहाचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख