कृषी विभागाशी संबंधीत असणार भरपूर प्रात्याक्षिके
प्रवेशासाठी 11308 हा असणार महाविद्यालयाचा काेड
संगमनेर (प्रतिनिधी) – गुणवत्ता पूर्ण शिक्षणाने देशात अग्रगण्य असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास मान्यता मिळाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व नोडल ऑफिसर प्रा. जी.बी बाचकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अनिल शिंदे म्हणाले की, मा. कृषिमंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने मागील 40 वर्षात गुणवत्तेने देशात आपला नावलौकिक निर्माण केला आहे या संस्थेच्या सर्व शाखा आयएसओ मानांकित असून यांनी याचे मानांकन झालेले आहे.
स्वच्छ सुंदर परिसरासह उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांना थेट नोकरीची सुविधा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यां बरोबरचा करार, अद्यावत होस्टेल, उत्कृष्ट भोजन व्यवस्था ,भव्य क्रीडांगण, सोलर सिस्टिम यांसह सर्व आधुनिक सुविधांमुळे अमृतवाहिनी हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे.
या संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास नव्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र शासन कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडून मान्यता मिळाली असून या वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
सर्व अत्याधुनिक सुविधा ,सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा अनुभवी प्राध्यापक वर्ग यांसह कृषी निगडित भरपूर प्रात्यक्षिक असणाऱ्या या महाविद्यालयाचा 11308 हा कोड असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.
संस्थेला मिळालेल्या या नवीन महाविद्यालया बद्दल माजी शिक्षण व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.