Sunday, September 24, 2023

संगमनेरात आक्रोश, तालुका बंदसह मोर्चाचे आयोजन

मंगळवारी एकवटणार हिंदू समाज, अत्याचार रोखण्याचे आवाहन

विविध संघटनाच्या सहभागातून लालबहाद्दूर शास्त्री चौक येथून ‘भगवा मोर्चा’ ला सुरूवात

संगमनेरचे ऐक्य वशांतता अबाधित ठेवा- आ. थोरात

दिल्ली नाका येथे पोलिसांवर संपूर्ण मॉबने हल्ला चढविला होता. हा हल्ला एवढा भयानक होता की पोलिसांनी तेथून अक्षरशः पळ काढला. या हल्ल्याची सर्व राज्यात चर्चा झाली.
त्यानंतर आता जोर्वे येथील घटना संगमनेरकरांसाठी धक्का देणारी होती. केरळ स्टोरी चित्रपटामधून हिंदू मुलींना अडकवून फूस लावून पळविले जाते हे दाखविण्यात आले. त्यानंतर मंचर येथील 16 वर्षे वयाच्या मुलीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. हिंदू ज्या गाईला पूजतात त्या गायांची कत्तल करून त्याचे मांस विकणारे कसाई कितीही वेळा पकडले तरी पुन्हा सापडतात.
एकूणच संगमनेरमधील हे घटनाक्रम बघता सर्व हिंदू एकत्र येताना दिसत आहे. अनेक गावातील नागरिकांनी याविषयी निवेदने दिले आहेत. एखादी घटना झाली की लगेच 8-10 जणांनी मिळून शिवीगाळ आणि मारहाण करायची. शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणींना त्रास द्यायचा या घटना नवीन नाहीत.
या घटनांचा उद्रेक म्हणून………..

युवावार्ता (प्रतिनिधी
संगमनेरन-
देशासह राज्यातील विविध ठिकाणी हिंदू समाजाच्या धार्मिक उत्सवांवर होणारे आघात, शोभायात्रांवर झालेले हल्ले, संगमनेरात गेल्या रविवारी जोर्वेनाका परिसरात जमावाचा तरुणांवर झालेला जीवघेणा हल्ला, लव्ह जिहादच्या वाढत्या घटना या सर्वांच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्रित येत येत्या मंगळवार 6 जून रोजी संगमनेर तालुका बंदसह ‘भगवा मोर्चा’ आयोजित केला आहे. देशभरात वाढणार्‍या घटना रोखण्यासाठी व त्याचा प्रतिकार आणि त्यासाठी कठोर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही मागणीसाठी समाज संघटीत झाला आहे. देशभरात विविध ठिकाणी लव्ह जिहाद सारखे प्रकार तसेच सामुहिक हल्ले व त्यातच महिनाभरापूर्वी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने हिंदू समाजाच्या मनात खद्खद् निर्माण झालेली असतांना मंचर (पुणे), मुंबई, दिल्ली अशाच काही घटना समोर आल्याने या संतापात भर पडली. त्यातच रविवारी किरकोळ कारणावरुन जोर्वे येथील आठ मुलांना संगमनेरातील जोर्वेनाका परिसरात सशस्त्र जमावाने हल्ला करीत बेदम मारहाण केली होती. यासर्व घटनांचा रोष आता उसळून बाहेर पडू लागला आहे.


त्या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकलव्य संघटना या हिंदुत्त्ववादी संघटनांसह विविध राजकीय पक्ष, संस्था, गणेश मंडळे व संघटनांच्या सहभागातून मंगळवारी सकाळी 9 वाजता लालबहाद्दूर शास्त्री चौक येथून ‘भगवा मोर्चा’ काढला जाणार आहे. तेथून बाजारपेठ मार्गे सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडीवरुन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बसस्थानक चौक या मार्गावरुन निघणार्या या मोर्चाचा नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर समारोप होणार आहे. या मोर्चात सकल हिंदू समाजाला सहभागी होता यावे यासाठी संगमनेर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या मोर्चात संगमनेरातील नागरीकांसह तालुक्यामधून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. शहर पोलिसांना दिलेल्या अर्जात जोर्वे येथील आठ तरुणांना मारहाण करण्याची घटना जिहादी मानसिकतेमधूनच झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही कालावधीपासून शहर व तालुक्याच्या विविध भागात धर्मांध मानसिकतेतून अशा घटनांसह महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार, हिंदू सणांच्या निमित्ताने वारंवार हल्ले व अडथळे आणण्याचे प्रकार, लव्ह जिहादच्या वाढत्या घटना या सर्वांना विरोध करण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी सदरील मोर्चाचे व संगमनेर तालुका बंदचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्सात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदी अधिकार्यांनी सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली एकवटलेल्या विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करत मोर्चा शांततामय मार्गाने पार पाडावा असे आवाहन केले आहे.

संगमनेरचे ऐक्य वशांतता अबाधित ठेवा- आ. थोरात

जोर्वे नाक्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. प्रशासनही याची काळजी घेत आहे, परंतु त्या घटनेला जातीय, धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत.
संगमनेर मध्ये असलेले विकासाचे आणि बंधूभावाचे वातावरण कौतुकास्पद आहे, आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. मात्र हे चांगले वातावरण बिघडवून, संगमनेरला अस्थिर करण्याचा काहिंचा प्रयत्नही सुरू आहे, हे नाकारता येणार नाही, याच घटकांकडून जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात आहे, मात्र यामागे दडलेला त्यांचा राजकीय सर्वांना ठाऊक आहे. एखाद्या घटनेला धार्मिक किंवा सामाजिक रंग देऊन संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवू देऊ नका, आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने मी आपणास करतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

पोलीसांकडून एकाचवेळी अनेक भंगार दुकानांची झाडाझडती

पोलीसांना संशय - चोरीचा माल भंगारातयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर तालुका,...

विखे – थोरात यांच्यात रंगला कलगीतुरा

पालक मंत्री रहा, मालक बनू नका - आ. थोरातपालकत्व कसे निभवयाचे आम्हाला चांगले...

कौटूंबीक वादातून जावयाने सहा जणांना भोसकले

पत्नी, मेहुणा, सासू ठार, तिघे गंभीरयुवावार्ता (प्रतिनिधी)शिर्डी - सासूचा संसारात हस्तक्षेप, बायको माहेरी...

संगमनेर फेस्टिव्हलची दिमाखात सुरूवात

उपक्रमातील सातत्य मोलाचे - आ. बाळासाहेब थोरातयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - एखादा उपक्रम सातत्याने पंधरा...

३५० पेक्षाही जास्त चिमुकल्यांनी रंगविले शाडू मातीचे गणपती

लायन्स संगमनेर सफायरचा स्तुत्य उपक्रमयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित शाडू...