Sunday, September 24, 2023

जनतानगरमध्ये महिलेसह चौघांना मारहाण

मारहाणीत कोयता फायटर व गजाचा वापर

मारहाणीत ६ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे –
शहरातील जनतानगर येथे गावगुंडानी दहशत माजवत फिर्यादी महिलेसह तिच्या भावाला, पतीला व आईला कोयता, गज, फायटर, पट्टा या घातक शस्त्राने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीसांनी चौघांसह सहा जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास जनतानगर येथे फिर्यादी अनुष्का दिपक जाधव (रा. जेलरोड नाशिक) यांच्या आईच्या घरासमोर आरोपी वरद लक्ष्मण लोहकरे, धीरज राजेंद्र पावडे, विक्रम रामनाथ घोडेकर, राज ओढ व इतर सहा जणांनी येऊन गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचा भाऊ व पतीला फायटर व पट्ट्याने मारहाण केली. यावेळी फिर्यादीची बहिण सोडवयला गेली असता तिला देखील छातीवर व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी गेल्याचा राग मनात धरून पुन्हा आरोपींनी त्यांच्या घरावर हल्ला करत फिर्यादीच्या आई, पती व मुलगा यांना मारहाण करत घरातील टिव्ही, फ्रिज, कुलर या किंमती वस्तूंची तोडफोड केली. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा रजि. नं. 431 भादंवि कलम 143, 147, 148, 149, 452, 324, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

पोलीसांकडून एकाचवेळी अनेक भंगार दुकानांची झाडाझडती

पोलीसांना संशय - चोरीचा माल भंगारातयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर तालुका,...

विखे – थोरात यांच्यात रंगला कलगीतुरा

पालक मंत्री रहा, मालक बनू नका - आ. थोरातपालकत्व कसे निभवयाचे आम्हाला चांगले...

कौटूंबीक वादातून जावयाने सहा जणांना भोसकले

पत्नी, मेहुणा, सासू ठार, तिघे गंभीरयुवावार्ता (प्रतिनिधी)शिर्डी - सासूचा संसारात हस्तक्षेप, बायको माहेरी...

संगमनेर फेस्टिव्हलची दिमाखात सुरूवात

उपक्रमातील सातत्य मोलाचे - आ. बाळासाहेब थोरातयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - एखादा उपक्रम सातत्याने पंधरा...

३५० पेक्षाही जास्त चिमुकल्यांनी रंगविले शाडू मातीचे गणपती

लायन्स संगमनेर सफायरचा स्तुत्य उपक्रमयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित शाडू...