संगमनेरात एक कॅमेरा पोलीसांसाठी अभियान

0
1589

गुन्हेगारीला बसणार आळा

सीसीटीव्हीच्या मदतीने नागरीकांच्या सुरक्षेत हाेणार वाढ


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – शहरात वाढलेल्या चोर्‍या, समाजकंटकांचा उपद्रव यामुळे नागरीकांची सुरक्षा धोक्यात येते. तसेच पोलीसांनाही तपासात अनेक अडथळे येतात. त्यामुळे गुन्हेगारांच्या तात्त्काळ शोधासाठी एक कॅमेरा पोलीसांसाठी हा उपक्रम संगमनेरात सुरू करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात एक कॅमेरा पोलिसांसाठी अभियान राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून संगमनेरात हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्यातील एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेला ठेवावा जेणेकरून रस्त्यावर घडलेल्या घटनांची त्या कॅमेरात छबी नोंद राहील. पोलिसांना तपास कामात त्याचा उपयोग होईल. तसेच दुकानदारांना देखील त्यांचे संरक्षणासाठी या कॅमेर्‍यांचा उपयोग होणार आहे. अनेकवेळा गुन्हेगार व पुरावा पोलीसांना मिळत नाही. मात्र या अभियानामुळे पोलीसांची मोठी गैरसोय दुर होणार आहे.
यापार्श्‍वभूमीवर पो. नि. मथुरे यांनी मेन रोड परिसरातील व्यापारी बांधवांची बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here