देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेरकरांसाठी ठरणार एक वरदान
विविध मान्यवरांची उपस्थिती
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे रुग्णांसाठी सर्व सुविधांयुक्त अद्ययावत उभारलेल्या देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दि. 11 जून रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजीत केला आहे. अशी माहिती देशमुख परिवाराने दिली.कान, नाक, घसा, नेत्र अजारांसह विविध आजारांवर अद्ययावत उपचार पद्धतीने उपचार करणार्या व जनरल मेडिसीन विभाग, श्वसन विकार व अॅलर्जी विभाग, अतिदक्षता विभाग, स्त्री रोग व प्रसूती विभाग, युरो सर्जन विभाग, अस्थिरोग विभाग अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्या देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेरकरांसाठी एक वरदान ठरणार आहे. या भव्य हॉस्पिटलचे उद्घाटन माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सुधीर तांबे असणार आहे.
याप्रसंगी आ. सत्यजीत तांबे, आ. डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, सौ. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, आरोग्य अधिकारी डॉ. सजय घोगरे, एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, राजंहस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव देशमुख, पतीत पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस.झेड. देशमुख, एस. आर. थोरात उद्योग समुहाचे संचालक आबासाहेब थोरात, श्रमिक उद्योग समुहाचे साहेबराव नवले, जिल्हा जातपडताळणी समिती अध्यक्ष विकास पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी नाशिक भागवत डोईफोडे, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन श्रीमती सुलोचना देशमुख, संजय देशमुख, सौ. उज्वला देशमुख, डॉ. अनिल देशमुख, डॉ, शुभदा देशमुख, डॉ, निलेश देशमुख, डॉ, तेजस्विनी देशमुख, डॉ, अमेय देशमुख, डॉ, ऋतूजा देशमुख, नचिकेत देशमुख, सौ. दैव्यानी देशमुख व देशमुख परिवाराने केले आहे.
अरोग्य सेवेची मोठी परंपरा असणार्या देशमुख परिवाराने संगमनेरकरांची व ग्रामिण भागातील नागरीकांची गरज ओळखून देशमुख मल्टीस्पेशालिटी या भव्य हॉस्पिटलची निर्मीती केली आहे. काही दिवसांपूर्वी नेत्र तज्ञ डॉ. निलेश देशमुख व डॉ. तेजस्विनी देशमुख यांच्या प्रयत्नातून एका चार वर्षांच्या चिमुकल्याला दृष्टी मिळाली होती. सर्वत्र नाकारलेल्या या गरिब मुलाला