निळवंडे कालव्यातून पाणी वाहिल्याने आयुष्याचे सोने झाले – आ. थोरात

निळवंडेचे पाणी आले हा तालुक्याच्या इतिहासातील सुवर्ण दिन

अनेक वर्षांच्या परिश्रमातून आजचा सोन्याचा दिवस – आमदार बाळासाहेब थोरात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – निळवंडेच्या कामाला 1999 नंतर खऱ्या अर्थाने गती मिळाली. यामध्ये अनेकांचे सहकार्य मिळाले असून प्रकल्पग्रस्तांचा त्यागही मोठा आहे. आपण सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा करून अनेक वर्षांच्या कामाचे सार्थक म्हणजे निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे थेट दुष्काळी भागात येणे हे आहे. हा तालुक्याच्या इतिहासातील सुवर्ण दिन असून आपल्या जीवनातील सोन्याचा दिवस ठरला असल्याचे गौरवउद्गार निळवंडे धरण व कालव्यांचे जनक तथा जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.निळवंडे येथे तळेगाव गट व संगमनेर तालुक्यासह दुष्काळी 182 गावांच्या वतीने आयोजित जलपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत मा.आ.डॉ सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव  कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, आर.बी.राहणे,  कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे,हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सौ.बेबीताई थोरात, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, सुधाकर जोशी, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, रायभान पवार, सुनील उकिरडे, जगन्नाथ घुगरकर आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजचा दिवस हा तालुक्यातील दिवाळीचा व आनंदाचा दिवस आहे.निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे तळेगाव भागात येणे हे पिढ्यानपिढ्यांचे स्वप्न साकार झाले आहे. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नातून हा सोन्याचा दिवस आपल्या जीवनात उगवला आहे.या निमित्ताने ज्यांनी या कामासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे ऋण व्यक्त होणे गरजेचे आहे.यामध्ये विविध सहकारी, अधिकारी, प्रकल्पग्रस्त, काम करणारे कामगार या सगळ्यांच्यामुळे हा सोन्याचा दिवस उगवला आहे. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राबवताना प्रकल्पग्रस्तांना अकोले व संगमनेर तालुक्यात शासकीय जमिनी दिल्या. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनचा शेरा उठवला. शेजारी तालुक्यातील कोणीही या कामी जमिनी दिल्या नाही. 2012 पर्यंत भिंत पूर्ण करून बोगद्यांची कामे मार्गी लावली. 2014 ते 19 काम थांडावले होते. 2019 नंतर पुन्हा कामाला गती दिली. कोरोना संकटातही रात्रंदिवस काम सुरू ठेवले. ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. आपण काम केले. श्रेयासाठी कधीही लढलो नाही. काम कोणी केले हे सर्व जनतेला माहिती आहे. पाणी आल्याने जीवनाचे सोने झाले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र काही मंडळी गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांचे निळवंडे व कालव्यांमध्ये योगदान काय आहे हा मोठा प्रश्न आहे. म्हणून भूलथापांना बळी पडू नका. मेहनत करून जर कोणी नकारात्मक बोलले तर वाईट वाटते. कष्ट करणाऱ्याच्या पाठीवर नेहमी थाप मारली पाहिजे.आपला तालुका हा आदर्श संस्कृतीचा तालुका आहे. विकासातून पुढे जातो आहे. मात्र हे काही लोकांना पहावत नसल्याने हेतू पुरस्कर विकासात आडकाठे घालण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहे. संधी शोधून तालुक्याचे वातावरण बिघडण्याचे काम ही मंडळी करत आहे.संगमनेर तालुक्यातील चैतन्यमय व सुकून असलेले वातावरण टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, अनेक वर्षापासून दुष्काळग्रस्त शेतकरी वाट पाहत होते.तो दिवस आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वातून आज उगवला आहे.

तर ॲड. कानवडे म्हणाले की,आ.थोरात यांनी सातत्याने तालुक्याला पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला असून त्यांच्या सातत्यपूर्ण कामातून हे पाणी मिळाले आहे.तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की,  कोरोना संकटात जग बंद असताना फक्त दवाखाने आणि कालव्यांची कामे सुरू होती. आ.थोरात यांच्या प्रयत्नातून आलेल्या पाण्याने पिवळी शेती काळी होणार असून हिरवे रान फुलणार आहे. यावेळी जि.प.सदस्य महेंद्र गोडगे, ज्ञानेश्वर वर्पे यांचीही भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर रणजीत सिंह देशमुख यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,युवक नागरिक, महिला व 182 गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1.       कालव्यांचे जनक आ थोरात यांची दोन किलोमीटर भव्य मिरवणूक

तळेगाव गटात निळवंडे धरणाचे पाणी आल्याने दुष्काळी गावांच्या वतीने धरणाचे जनक आमदार बाळासाहेब थोरात यांची दोन किलोमीटर सपत्नीक भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा रोषणाई करून ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत आमदार थोरात यांचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

2.       ते बिघडवण्यासाठी येतात आम्ही घडवण्यासाठी जातो

संगमनेर तालुक्यातील सुसंस्कृत शांततामय व विकासाचे वातावरण बिघडवण्यासाठी ते येतात. मात्र आम्ही गणेश परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी त्यांचे जीवनमान घडावे यासाठी जात आहोत.

3.       गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे .या मताचे आम्ही आहोत. मात्र संधी शोधून संगमनेर मध्ये धार्मिक तेढ करुन अशांतता निर्माण करण्याचे काम काही मंडळी हेतू पुरस्कर करत असून अशा प्रवृत्तींना सर्वांनी वेळीच रोखले पाहिजे असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख