आता माघार नाही – जरांगे

मराठा मोर्चा नगरमध्ये मुक्कामी

युवावार्ता (प्रतिनिधी)
नगर – मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगाफटका झाला, काही षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला, गोळ्या झाडल्या तरी एकही इंचही मागे हटणार नाही. काही गडबड झाली तर अशावेळी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभा राहा, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रविवारी सकाळी नगर जिल्ह्यात ( मीडसांगवी (ता. पाथर्डी) येथे दाखल झाली होती. तर आज सोमवारी देशभर रामलल्लाचा जयघोष सुरू असला तरी हा मोर्चा त्याच जोमाने मुंबईकडे मार्गस्थ होत आहे. जिल्ह्यात मराठा समाजबांधवांनी मनोज जरांगे व या मोर्चाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. तरुणांसोबत महिलाही या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाला संबोधीत करतांना भीम सांगवी येथे जरांगे पाटील म्हणाले, सरकारला मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? सात महिने वेळ दिला. आता सरकारला एक ताससुद्धा वेळ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, हे निश्चित आहे. सरकारने आम्हाला त्रास किंवा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही.
आज समोवारी सकाळी हा मोर्चा मुंबईकडे निघाल्यानंतर भोजनासाठी सुपा येथे दुपारी थांबला होता. पिठले -भाकरी, कांदा, ठेचा असे अस्सल मराठी भोजन करून मराठा आरक्षण घेणारच, सोबतच जय श्रीरामाच्या घोषणा देत हा मोर्चा रांजणगाव गणपती येथे मुक्कामासाठी रवाना झाला. दरम्यान नगर जिल्ह्यातून जाणार्‍या या मोर्चासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संगमनेरकरांनी केली होती. सुमारे 1 लाख पेक्षा जास्त पाणी बॉटल वाटून संगमनेरकरांनी आपाला मोठा सहभाग या मोर्चात घेतला. मराठा मोर्चा जसजसा मुंबईकडे मार्गस्थ होत आहे. तस तशी राज्य सरकारची डोकेदुखी वाढू लागली आहे. सरकारच्यावतीने या मोर्चाला मुंबईत न येण्याचा इशाराही दिला जात आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या मागणीवर व निर्णयावर ठाम असल्याने सरकार मोठ्या पेचात सापडला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख