वृषाली कडलग यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान

वृषाली कडलग यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामाबाबत सन्मान

युवावार्ता(प्रतिनिधी )
संगमनेर –
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख मळा, धांदरफळच्या उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना ’ नॅशनल वुमन एक्सलन्स अवॉर्ड ’ नुकताच प्राप्त झाला आहे.


राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित असलेला नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड राजधानी दिल्ली येथे महिला दिनानिमित्त शानदार समारंभात प्रदान करण्यात आला . टीम जेनिथ इंडियाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात करण्यात आला. त्यात नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड, पंडित बिरजू महाराज नृत्यरत्न पुरस्कार, राष्ट्रीय संगीतरत्न पुरस्कार, योगरत्ना पुरस्कार व फैशन आइकॉन ऑफ़ इंडिया हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी खा. सुनीता दुग्गल, माजी मंत्री सुनील भराला, माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप, परफेक्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता कोडे, पद्मश्री डॉ. शोभना नारायण, सुरेखा लामतुरे, उपभोगता आयोगाचे सिद्धेश्‍वर कानिटकर, टीम जेनिथचे मिथिल कलम्बे उपस्थित होते.


रविवारी नवी दिल्ली येथे ’मुलींवरील हिंसाचार – आव्हाने आणि मार्ग’ या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार वृषाली कडलग यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. जि. प. प्राथ. शाळा देशमुख मळा, धांदरफळ येथील उपक्रमशील शिक्षिका म्हणून केलेल्या शैक्षणिक कार्याचा व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट म्हणून दिलेल्या सामाजिक योगदानाचा व महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या विशेष योगदानाचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. या कार्यकर्तुत्वाबद्दल ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ ची मान्यता मिळवणार्‍या वृषाली कडलग या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या शिक्षिका ठरल्या आहेत. वृषाली कडलग यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख मळा, धांदरफळ या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी लोकसहभागातून केलेल्या कार्याची ही या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आलेली आहे. वृषाली कडलग यांनी इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट म्हणून कुपोषण मुक्त समाज निर्मिती, महिलांमधील कॅन्सर संदर्भात जनजागृती उपक्रम, वयात येणार्‍या मुलींसाठी कळी उमलताना प्रकल्प, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, प्रकल्प प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील 21 शाळांमधून आनंदी शाळा प्रकल्प राबविला आहे. जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी वधू वर सूचक मेळाव्यांचे आयोजनही त्यांनी केलेले आहे. वृषाली कडलग यांना नाशिक येथील द पॉईंट नाऊ या संस्थेतर्फे द इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2022, मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. वृषाली कडलग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख