संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  राष्ट्रीय पातळीवर “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धा उत्साहात

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर येथे आयोजित केलेल्या “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धेचे उदघाटन करताना
संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, श्री. नरेंद्र हेगडे, सोबत प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण, डॉ. विक्रांत निकम,
डॉ. दिनेश हासे आणि डॉ. सादिक सय्यद.

विविध राज्यातील व एकूण ०७ विद्यापीठातील, १५० संशोधन प्रकल्प सादर

एक लाख रुपयांची रोख रक्कम पारितोषिक स्वरूपात वितरित

संगमनेर- संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर येथे राष्ट्रीय स्तरावरील “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन परिषदे अंतर्गत पहिल्या संशोधन परिषदेचे आयोजन आय.क्यू.ए.सी. व असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च, २०२३ रोजी करण्यात आले होते.

अमृतफार्माथॉन२०२३ या परिषदेचे प्रमुख पाहुणे उद्योजक श्री. नरेंद्र हेगडे, संचालक, एन. व्ही. फार्मा, नाशिक यांनी औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनाचे महत्व आणि व्यवसाय यशस्वीतेबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त व मार्गदर्शक सौ. शरयूताई देशमुख या उपस्थित होत्या. “या स्पर्धेमुळे तरुण वर्गातील कल्पनाशक्तीला चालना मिळेल आणि नवनवीन संशोधन जगासमोर मांडण्यासाठी अशा स्पर्धांची आवश्यकता आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून स्पर्धेचा उद्देश विशद केला. अमृतफार्माथॉन२०२३ ही संशोधन परिषद विद्यार्थ्यामध्ये पदवीपूर्व संशोधनाची उत्सुकता निर्माण करणे, पदव्यूत्तर विद्यार्थाना संशोधन उपक्रमांसाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या संशोधन परिषदेत विविध राज्यातील व एकूण ०७ विद्यापीठातील, १५० संशोधन प्रकल्प सादर केले, त्यात ३५० विद्यार्थी सहभागी झाले.

परिषदेत विविध बहुराष्ट्रीय फार्मा इंडस्ट्रीजचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ तसेच विविध महाविद्यालयांतून  तज्ज्ञ प्राध्यापकांना दोन स्तरावर  मूल्यांकनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेसाठी मूल्यमापन कर्ता म्हणून ग्लेनमार्क फार्माचे श्री. गिरीश त्रिवेदी, श्री. प्रवीण कुमार शर्मा, श्री. योगेश कडू आणि कोर ऍनालीटीकल्सचे श्री. अमोल मोरे यांनी संशोधनाचे मूल्यांकन केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी दिली.

या परिषदेमध्ये पदवी पातळीवर मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, पारनेरच्या अभिषेक  पांगे आणि चंद्रकांत घंगाळे या विद्यार्थानी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेरच्या वैष्णवी वाघ आणि गौरी हळनोर यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. संजीवनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोपरगावच्या श्रुती कांबळे, श्रुती कानडे आणि स्मिता ढमाले यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. के बी एच  इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, मालेगावचे विद्याथी जयेश पाटील आणि चैताली मार्कंड आणि एआईएसएसपीएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील श्रावणी निघोत, अवनी पुराणिक, प्रज्ञा मगदूम आणि नुपूर टिळेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

फार्मास्यूटीकस विषयात पदव्यूत्तर पातळीवर एमईटी  इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, नाशिकच्या शितल गोसावी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. डॉ. डी. वाय. पाटील  इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, पुणे येथील प्रिया रोडगे यांनी आणि एमईटी  इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, नाशिकच्या माधुरी देशमुख यांनी दुसऱ्या  क्रमांकाचे तसेच अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेरच्या निकिता राठोड आणि देवांश गोसावी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. एआईएसएसपीएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील रेश्मा मते आणि अभिषेक पवार  यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

फार्मास्यूटीकल केमिस्ट्री विषयात पदव्यूत्तर पातळीवर केबीएच इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, मालेगावच्या मनेश शेजवळ यांनी प्रथम क्रमांकाचे आणि गौरव देवरे यांनी दुसऱ्या क्रमांकाचे व अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेरच्या मानसी दिघे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

फार्माकोग्नोसी आणि फार्माकोलोजी विषयात पदव्यूत्तर पातळीवर अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेरच्या गायत्री जेजुरकर यांनी आणि  एआईएसएसपीएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणेच्या मंथन रोडे आणि चेतश्री  पाटील  यांनी प्रथम क्रमांकाचे,  अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेरच्या अक्षदा गाडेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाचे तसेच अभिनव कॉलेज ऑफ फार्मसी, पुणेच्या गायत्री कोरंजवणे , प्रतीक्षा बेटके आणि दिपाली कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

अमृतफार्माथॉन२०२३ स्पर्धेमध्ये एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम पारितोषिक स्वरूपात वितरित करण्यात आली. तसेच यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थाचे मार्गदर्शक व महाविद्यालयास रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरवण्यात आले अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विक्रांत निकम यांनी दिली. या संशोधन परिषदेसाठी पदव्यूत्तर व पदवी विभागाकरिता समन्वयक म्हणून डॉ. दिनेश हासे, डॉ. सादिक सय्यद, डॉ. विशाल मोरे, डॉ. दिपक  राऊत, डॉ. महेश देशपांडे व डॉ. देशराज चुंभळे आणि प्रा. हृषिकेश वेलीस यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरीता विशेष मेहनत घेतली.

संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात व संस्थेचे विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे, विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, साखर कारखान्याचे संचालक श्री. इंद्रजीत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख